दोंडाईचा,धुळे : नुतन माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात “वृक्ष लागवडीचा” कार्यक्रम संपन्न

725

” वृक्ष चळवळ ” ही फक्त कागदावरच न राहता प्रत्यक्ष जमीनीवर अंमलात आणली पाहिजे

 -मा. नगराध्यक्ष डॉ. रविंद्र देशमुख

दोंडाईचा,धुळे (-प्रतिनिधी, समाधान ठाकरे ) : “वृक्ष चळवळ” ही फक्त कागदावरच न राहता प्रत्यक्ष जमीनीवर अंमलात आणली पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थाने ह्या देशात “हरितक्रांती” चे युग येऊन देशाचा चेहरा बदलेल असे मत मा.नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख यांनी “वृक्ष लागवड” प्रसंगी व्यक्त केले. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे शहरात पावसाने चांगलीच रिमझिम सुरू ठेवल्यामुळे नुतन माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात “वृक्ष लागवडीचा” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेचे संचालक अमित पाटील, मुख्याध्यापक ए. डी.पाटील, जे.एम. पटेल, महेन्द्र गिरासे, नंदलाल बागल, पी.आर.देवरे, बी.जी.भदाणे, एन.के.ठाकरे, एस.टी.कागणे, विवेक पाटणकर, कुवर सर, सदाराव सर, बडगुजर सर, एन.एस.पाटील, गणेश चव्हाण, प्रभु शिंंदे, अय्युब मन्सुरी, लालचंद चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. बापूसाहेब यांनी पुढे सांगितले की, ” सध्या महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती खुप डगमगीत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या परिसरात  झाडाचे प्रमाण कमी असणे हे आहे. सरकार दरवर्षी करोडो रूपये वृक्ष लागवडीसाठी खर्च करत असते. मात्र ही वृक्ष लागवड पाहिजे त्या प्रमाणात खालच्या पातळीपर्यंत राबवली जात नाही आहे. म्हणून महाराष्ट्रात वृक्षाचे प्रमाण कमी आहे. जर अशीच झाडाचे प्रमाण कमी राहील तर येणाऱ्या काळात निसर्गाचा असमतोल होईल व मनुष्याला अनेक नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागेल. म्हणून देशातील, राज्यातील प्रत्येक व्यक्तीने ऐकतरी झाड लावणे व जगवणे हे आपले आद्य कर्तव्य मानले पाहिजे. सरकार करोडो रुपये दरवर्षी झाडे लावणे, जगण्यावर खर्च करते पण मधली बरीच मंडळी हा उपक्रम साध्य होवू देत नाही व सरकारला चुत्या बनवुन करोडो रुपये हडप करून जातात. म्हणून मला असे वाटते की, “वृक्ष लागवड” ही चळवळ नुसती कागदावरच न राहता प्रत्यक्ष जमिनीवर अंमलात आणली गेली पाहिजे तेव्हाच भारतात, महाराष्ट्रात “हरितक्रांती “चे युग येवुन सर्वांकडे सुजलाम, सुफलाम दिसेल व प्रत्येक व्यक्ती खर्या अर्थाने सुखी, समरूद्ध होईल असेही शेवटी त्यांनी ठासून सांगितले.
यावेळी सर्व नुतन माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

 

 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *