फाकटे,शिरूर : विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान,वन विभागाचे प्रयत्न यशस्वी

1469

    फाकटे,शिरूर : (संपादक,देवकीनंदन शेटे) – शिरूर तालुक्यातील फाकटे गावात गावडे वस्तीजवळील रामदास काशिनाथ भालेकर एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला जुन्नर,शिरूर वन विभागाच्या पथकाने यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन करीत विहिरीत पिंजरा सोडत जेरबंद केले. भक्षाच्या शोधात अंधारात हा बिबट्या आज पहाटेच्या सुमारास विहिरीत पडला असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.तर शेतकरी भालेकर हे प्रातर्विधीसाठी घरानजीकच असणाऱ्या विहरीकडून जात असताना त्यांना विहिरीत गुरगुरण्याचा आवाज आल्याने त्यांनी विहिरीत डोकावले असता त्यांना बिबट्या विहिरीतील पाण्यात पडलेला दिसला. त्यांनी तातडीने ही बाब स्थानिक ग्रामस्थ व वन विभागास कळविल्यानंतर माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय देशमुख,त्यांची रेस्क्यू टीम व शिरूर वन विभागाच्या वनपाल सी ए काटे यांच्या टीमच्या अथक प्रयत्नाने रात्री विहिरीत पडलेल्या बिबट्याला आज रविवारी सकाळी ११ च्या दरम्यान विहिरीत पिंजरा सोडून सहीसलामत जेरबंद करण्यात आले. दरम्यान रात्री विहिरीत पडलेला बिबट्या पाण्यात पोहून दमल्याने पिंजरा विहिरीत सोडताच लगेचच पिंजऱ्यात गेला. बिबट्या पाहण्यासाठी परिसरातून मोठीच गर्दी झाली होती. वन विभागाने केलेल्या या बिबट्या बचाव कार्याचे फाकटे गावचे पोलीस पाटील श्रीकांत गायकवाड,तंटामुक्त समिती अध्यक्ष एकनाथ राळे,उमेश गायकवाड,नागेश केदारी व फाकटे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *