शिरूर,पुणे : जि.प.प्रा.शाळा शिरूर ग्रामीण आणि पांडुरंग अण्णा थोरात विद्यालय रामलिंग येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

748
       शिरूर,पुणे (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – जि.प.प्रा.शाळा शिरूर ग्रामीण आणि पांडुरंग अण्णा थोरात विद्यालय रामलिंग येथे आज गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. शिरूरच्या रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या  युगात गुरू आणि शिष्य यांचे महत्त्व सर्वांना समजावे ,गुरू शिवाय काहीच शक्य नाही.त्यामुळे नेहमी शिक्षकांचा आदर केला पाहिजे. पहिले गुरू आई – वडील नंतर शिक्षक असतात शिक्षकांना प्रेरणा मिळावी,त्यांचा विषयी आदर व्यक्त करण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा  राणी कर्डिले यांनी सर्व शिक्षकांना सन्मान चिन्ह देऊन गुरू पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी त्यांनी मुलांना गुरू चे जीवनात असलेले स्थान किती महत्त्वाचे असते याविषयी मार्गदर्शन केले.
          यावेळी पांडुरंग अण्णा थोरात विद्यालयातील 10 विच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचे पाय धुऊन पूजन केले व शिक्षकांना फुल आणि पेन देऊन सन्मानित केले.गुरु प्रति सदभावनेचे प्रतीक म्हणून लहान विद्यार्थ्यांना यातून एक छान आदर्श पाहावयास मिळाला.
           यावेळी ग्रापंचायत सदस्य यशवंत कर्डिले यांनी मुलांना मार्गदर्शन करून शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.प्रमुख पाहुणे म्हणून खरेदी विक्री संघाचे संचालक नामदेव तात्या जाधव,माजी सरपंच रामदास जामदार, ग्रापंचायत सदस्य हिरामण अप्पा जाधव, शाळा व्यवस्थान समितीचे अध्यक्ष माऊली रेपाळे,माजी ग्रापंचायत सदस्या  सुनंदा घावटे,सविता कापरे उपस्थित होत्या. जिल्हा परिषद शाळेचा मुख्यध्यापिका रंजना वाखारे, पांडुरंग अण्णा थोरात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका  स्वाती थोरात,शिक्षिका शिर्के,हिंगे,वेताळ,सालकर,जाधव,मांजरे ,वाबळे,बोर्डे, शिक्षक रासकर,पोटे,शिंदे,पोटघन,दासीमे या सर्व शिक्षकांना गौरविण्यात आले. राणी कर्डिले यांनी सूत्रसंचालन केले, पोटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *