शिंदखेडा तालुक्यातील तरूण झाला ” इसरो ” मध्ये भरती

2268
दोंडाईचा, धुळे (-प्रतिनिधी, समाधान ठाकरे) : शिंदखेडा तालुक्यातील पथारे येथील सागर रणजितसिंह राजपूत या २५ वर्षीय तरुणाने गरीब परीस्थितीत वडीलांच्या अपार मेहनतीच्या आणि स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर अहमदाबाद येथील भारतीय अंतराळ संशोधन केंद्रात (ISRO) झेप घेतली आहे. चांद्रयान-२ अवकाशात झेपावत असतांना सागरच्या हातात आपली (ISRO) मध्ये तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाल्याचा ई-मेल आल्यानंतर त्याचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे त्यांनी सांगितले.
                      देशाला अंतरिक्ष संशोधनातील महत्वपूर्ण माहिती मिळवावी माहिती तंत्रज्ञानात आपण नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत करावी, यासाठी ISRO मधून देशातील अंगी गुणवत्ता आलेल्या तरुणांना ISRO च्या वतीने संधी उपलब्ध करून दिल्या जातात. आपल्या देशाला माहीत तंत्रज्ञानबाबत स्वयंपूर्णतेकडे नेण्याबाबत आपला थोडा का होईना खारीच्या वाट्याचा हातभार लागेल या कल्पनेनेच त्याला आकाश ठेंगणे वाटू लागले आहे. पथारे या छोट्याशा गावात सागर आपले आई-वडील व एक भावासह राहतो. वडील टेलरकाम करत असून शेतजमीन गहाण ठेवली असता दोघ भावानी किराणा दुकान, होटेल, चहाच्या दुकानात, पतसंस्थेत काम करून आपल्या वडिलांच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावला. मोठा भाऊ निम्न लष्करी दळ (ITBP) मध्ये भरती झाल्यानंतर आर्थिक परिस्थिती सुधारत असता सागरने उच्च शिक्षण घ्यावे अशी आई आणि भाऊ यांनी इच्छा व्यक्त करत आपल्या लहान भावाचे शिक्षण पूर्ण केले.
सागर याने शिरपुर आयटीआय मधून इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक चा अभ्यासक्रम पूर्ण केला. मोठ्या भावाच्या आणि काही हितचिंतकांचा उच्च शिक्षणाचा सल्ला घेत त्याने दोंडाईचा येथील अहिंसा पॉलिटेक्निक कॉलेज मधुन डिप्लोमा ईन E&TC हा अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर शिरपूर येथील सुप्रसिद्ध आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातुन  E&TC Engineering हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. २०१८ मध्ये अॉनलाइनवर अहमदाबाद येथील भारतीय अंतराळ संशोधन केंद्र (ISRO) मध्ये टेक्निशियन पदाची जाहीरात त्याच्या वाचनात आली. आपल्याला पुन्हा अशी संधी मिळणार नाही अशी मनाशी खुणगाठ बांधत त्याने यश मिळविले. आता त्याला ISRO मध्ये काम करण्याची संधी मिळाल्याने तो आनंदीत झाला असून एकाच वेळी शासनाची सेवा, देशाची सेवा करण्याची संधी मिळाल्याने तो खुपच आनंदीत आहे. परिसरातील तरुण मंडळींची  सागरला भेटण्यासाठी मोठी गर्दी पाहवायस मिळत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *