शिक्रापूर,शिरूर : कधीही आषाढी वारीला न जाणारे संत सावता महाराज हे विठ्ठलाचे परम भक्त होते – ह.भ.प. रामराव महाराज ढोक

2220
         शिक्रापूर,शिरूर : (राजाराम गायकवाड,प्रतिनिधी) – कधीही पंढरीच्या आषाढी वारीला न जाणारे संत सावता महाराज हे विठ्ठलाचे परम भक्त होते असे प्रतिपादन ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांनी केले. ते आज शिक्रापूर येथे संत शिरोमणी सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त आयोजित कीर्तन सेवेतून प्रभोदन करताना बोलत होते. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
           संत सावतामाळी टृस्ट व शिक्रापूर ग्रामस्थ यांच्या वतीने ह.भ.प. रामायणचार्य रामराव ढोक महाराज यांच्या किर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला.ते पुढे म्हणाले कि,सर्व संतानी आपआपल्या समाजाचा अभिमान ठेवला .जगाचा बाप विठ्ठल देखील सावता महारांजाची भक्ती पाहुन स्वतः अरण भेडीला आले.   हा इतिहास आहे. सावता सागर आहे तर भगवंत भक्तीचा भुकेला आहे.  सुमारे अडीच तास चाललेल्या किर्तन सेवेमध्ये सावता महारांजाच्या संपूर्ण जीवन चरिञाचा आढावा ढोक महाराजांनी घेतला. यामध्ये बहुसंख्य नागरिक उपस्थित होते .आज ३१जुलै रोजी पुण्यतिथी निमित्त सकाळी ९वाजता पालखीची मिरवणूक काढण्यात आली .यावेळी  पाबळ येथील माऊली महाराज पिंगळे यांच्या २० शिष्यगणासह ही  मिरवणुक पावसाच्या मोठ्या सरी झेलत पार पडली .किर्तानाला महिला वर्गाचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता .या व्यतिरिक्त शिक्रापूर नजीकच्या राऊतवाडी,तळेगाव ढमढेरे व इतर गावामध्ये संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
           यावेळी नाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे पांडुरंग राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल,रविंद्र भुजबळ, निवृती जकाते ,माऊली खेडकर,बाजार समितीचे माजी उपसभापती अनिल भुजबळ, प्रताप बांदल,सुरेश थोरात, बाळासाहेब चव्हाण, मोहन विरोळे , शिक्रापूरच्या  माजी सरपंच अंजना भुजबळ भगवान गायकवाड,खंडेराव खरपुडे, सुदाम कळमकर, बाबा भुजबळ,डाँ मच्छिन्द्र गायकवाड,रमेश भुजबळ, बंडु राऊत अन्य मान्यवर उपस्थित होते.  तसेच यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असलेल्या डाँ दिनकर कळमक, शिवाजी गायकवाड यांचा फुले पगडी देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. नंतर उपस्थित सर्वांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *