श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 669 वा संजीवन समाधी सोहळा संपन्न

671

दोंडाईचा, धुळे (-प्रतिनिधी, समाधान ठाकरे) : क्षत्रिय अहिर शिंपी समाज दोंडाईचा शहर त्यांच्या वतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची 669 वी संजीवन समाधी सोहळा समाजाच्या मालकीच्या मंगल कार्यालयात दि. 30 रोजी साजरा करण्यात आला.  शिंपीसमाजाचे अध्यक्ष सुरेश बागुल यांच्या हस्ते नामदेव महाराजांच्या पालखीचे पूजन, व आरती करण्यात आली. पालखीची शोभायात्रा राऊळ नगर, डी.आर हायस्कूल, शिवाजी पुतळा आधी मार्गाने काढण्यात आली. पालखीची सांगता मंगल कार्यालयात उपअध्यक्ष शरद पवार ह्यांचा हस्ते करण्यात आले. समाजाच्या पुढील कार्याचा आढावा व नियोजन अध्यक्ष सुरेश बागुल यांनी प्रास्ताविक केले. तसेच समाजाच्या पुढील कामासाठी आर्थिक मदतीचे आवाहन यावेळेस करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती सरकार साहेब रावल होते. यावेळेस साहेब बोलताना म्हणाले की सामाजिक व संस्कारी जीवनशैली बाबत मार्गदर्शन केले, त्यांनतर नवयुवक मंडळा तर्फे गुणवंत विद्यार्थीचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपाध्यक्ष पांडुरंग शिंपी, सहसचिव रविंद्र खैरनार, सल्लागार हरिदास जगताप, प्रकाश भांडारकर, राजेंन्द्र गवळे, रामदास खैरनार, सुकलाल जगताप, युवक अध्यक्ष सतिष जाधव, महिला अध्यक्षा सौ. सुरेखा जाधव व शिंपी समाजातील पुरुष बांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव लक्ष्मीकांत खैरनार यांनी केले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *