स्वतःच्या दुःखात लहान मुलांचे सुःख पाहत सुरु केलेलाअन्नदानाचा उपक्रम

555

स्वतःच्या दुःखात लहान मुलांचे सुःख पाहत सुरु केलेलाअन्नदानाचा उपक्रम कौतुकास्पद 

–  डॉ.वैशाली साखरे यांचे प्रतिपादन   

 

शिक्रापूर,ता.शिरुर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : तिरंगा प्रतिष्टानचे अध्यक्ष अनिल गायकवाड यांनी आई-वडिलांच्या पुण्य स्मरणार्थ निमित्त शिरुर-रामलिंग रोडवरील मोतीनाला आश्रम  शाळेमध्ये जाऊन न्नदानाचा कार्यक्रम संपन्न केला. शाळेतील  २२५ मुला मुलींनी भोजनाचाचा आस्वाद घेतला. यावेळी आश्रम शाळा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय लगड, उद्योजक बाळासाहेब जामदार, राहुल दसगुडे, बापुसाहेब दसगुडे, माजी नगरसेविका माया गायकवाड, शिवनेरी रिक्षासंघटनेचे अध्यक्ष रविंद्र मांढरे, पुणे पदवीधर संघटनेचे कार्याध्यक्ष शहाजी पवार, बालरंगभुमी / नाट्य परिषदेचे  सदस्य राजाराम गायकवाड, राहुल महाजन, बंडु धुदाणे, प्रफुल्ल सरदार, अनिता वाघ कल्याण कोकाटे, आर एन खेडकर माहेर संस्थेच्या मिना भागवत, अन्य उपस्थित होते . या कार्यक्रमामध्ये आश्रम शाळेच्या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विजय लगड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन तिरंगा प्रतिष्टानचे अध्यक्ष अनिल गायकवाड व मनस्विनीच्या अध्यक्षा वैशाली गायकवाड यांनी केले. श्रावण महिन्याच्या सुरवातील गायकवाड परिवाराने आश्रम शाळेतील मुंलाना स्वादिष्ट भोजन दिल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता.  शाळेचे मुख्यध्यापक संजय जाधव यांनी स्वागतपर प्रस्ताविक करुन शाळेची महिती सांगितली. चांगला उपक्रम राबवत असल्याबद्दल गायकवाड दांपत्याचे कौतुक केले. अभार ज्ञानेश्वर बाबर यांनी अभार मानले.

 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *