शिरूर येथील कार्यक्रमात खा. कोल्हे यांना यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशन यांच्या वतीने निवेदन

1001

शिक्रापूर,ता.शिरुर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शासनाने लाभार्थीसाठी निराधार योजनेचे मासिक महीना ६०० रूपये वरून  ५००० ते  ६००० रूपये करण्याबाबत मंगळवार दि. ६ ऑगस्ट रोजी यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशन यांच्या वतीने शिरुर चे खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेब यांना निवेदन देण्यात आले. यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशन यांच्या वतीने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी हा विषय लोकसभेत घ्यावा आणि शासनानेची जी काही महिलांनासाठी निराधार योजना आहे अशा गरजूं व गरिब महिलांच्या खात्यात (पूर्ण रक्कम जमा) होण्यासाठी प्रयत्न करावे असे निवेदनात असल्याचे यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशनच्या सचिव नम्रता गवारी यांनी सांगितले. ज्या महिलांचे वय ६५ च्या पुढे आहे, त्यांना लवकरात लवकर पेन्शन चालू करावी व शासनाने ज्या योजनांचे मानधन (पैसे) लवकरात लवकर दयावे व खात्यावर वेळेत (पैसे) जमा करावे. आशी मागणी यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशन यांच्या वतीने खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना करण्यात आल्याचे नम्रता गवारी यांनी सांगितले. या वेळी पुष्पा जाधव, शारदा भुजबळ, चंदना गायकवाड, मंगल जाधव, सिंधू जाधव, सविता नवगिरे आदी उपस्थित होते.

 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *