कश्मीर चा विशेष राज्याचा दर्जा काढुन घेतल्यानिमित्त दोंडाईचा येथे शिवसेनेतर्फे आनंदोत्सव साजरा

816
दोंडाईचा, धुळे (-प्रतिनिधी, समाधान ठाकरे) : आपण सदैव कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारत एक आहे हेच ऐकत आलो. परंतु कश्मीर राज्याला दिलेल्या विशेष दर्जा मूळ या भारत एक असण्याच्या मुळ संकल्पनेलाच तडा जात होता. परंतु राज्यसभेमध्ये कश्मीरचा विशेष राज्याचा अधिकार काढून घेतल्याने, कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारत एक झाला आहे.  बाळासाहेब ठाकरे,अटल बिहारी वाजपेयी आणि अशा अनेक देशभक्तांची स्वप्न आज पूर्ण झाले. तसेच या कश्मीरच्या रक्षणासाठी ज्या सैनिकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिलं त्या सैनिकांना देखील ही खऱ्या अर्थाने मानवंदना ठरली. या निर्णयाचा जल्लोष करण्यासाठी तसेच आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आणि कश्मीरच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या सैनिकांना आणि शहीद झालेल्या सैनिकांना मानवंदना देण्यासाठी दोंडाईचा शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास  हार घालून, अभिवादन करून ढोल-ताशांच्या गजरात, फटाके फोडून, तसेच प्रचंड टाळ्यांच्या कडकडात एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख चेतन राजपूत तसेच भाजपाचे शहराध्यक्ष प्रवीण महाजन यांनी मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, नगरसेवक हितेंद्र महाले, कृष्णा नगराळे, भरतरी ठाकुर, संजय तावडे, लायन्स क्लबचे राकेश अग्रवाल, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार शहर संघटक राका शेठ उपशहर प्रमुख आकाश कोळी, विजय भोई राकेश पेठकर, आबा चित्ते, युवा सेनेचे अजय विसावे, देवेंद्र अहिरे, निलेश विसावे, लखन मराठे, संदीप भोई,चेतन साबळे, गोविंद नागदेव, भूषण चौधरी, टायगर धनगर, युवराज वानखेडे, दिपक मराठे, विठोबा कोळी, दिपक मराठे, प्रफुल्ल भोई,बाबाजी धनगर,महादेवपुरा मित्रमंडळाचे संदिप ठाकुर, बापु गिरासे, गोलु चौधरी, टायगर ग्रूपचे भुषण पारधी,अनिल कोळी,भरत भोई,छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळाचे सनी हजारे,आकाश महाजन,विक्की पाटील,अमोल कापडणेकर आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमावेळी युवक कॉंग्रेसचे पुष्पक पाटील यांनी तिरंगा वाटप केले. समस्त शिवसैनिकांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *