दोंडाईचात प्रहारला मुख्याधिकाऱ्यांचा दिलासा ; आंदोलन स्थगित

863
दोंडाईचा, धुळे (-प्रतिनिधी, समाधान ठाकरे) : नगरपालिकेचे राखीव दिव्यांग निधीचे वाटप करावे, या मागणीसाठी करण्यात येणारे आंदोलन स्थगित करावे यासाठी मुख्याधिकारी यांनी आज आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांच्या मागणीची पूर्तता पंधरा दिवसात करण्यात येणार असल्याची सांगितले. प्रहार शिंदखेडा तालुका अध्यक्ष पंकज सिसोदिया, जिल्हाध्यक्ष वसंत बोरसे, दोंडाईचा शहराध्यक्ष पंकज चौधरी, महिला अध्यक्ष सीमाताई बागले, यांच्या उपस्थितीत मुख्याधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिले आहे.
दोंडाईचा शहरातील दिव्यांगांना राखीव निधीसह शासकीय योजनांचा लाभ मिळावा, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने नगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. शिवाय या मागणीसाठी ०६ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.पण आज सकाळी मुख्याधिकारी यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत समज देऊन आंदोलन न करण्याची विनंती केली कारण प्रहारच्या मागणी सर १८ जुलै रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत दिव्यांगांना पाच टक्के राखीव निधीचा लाभ देण्याचा निर्णय झाला असून त्यासंदर्भातील ठरावावर पीठासीन अधिकारी यांची सही आणि अन्य प्रशासकीय बाबींची पूर्तता करण्यासाठी पंधरा दिवसाचा कालावधी लागणार असल्याने आजचे आंदोलन स्थगित करावे असे या पत्रात नमूद केले होते. मुख्याधिकाऱ्यांच्या या विनंतीला मान ठेवून प्रहारने आजचे आंदोलन स्थगित केले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत भोसले, शिंदखेडा तालुका अध्यक्ष पंकज सिसोदिया, दोंडाईचा शहराध्यक्ष पंकज चौधरी, दोंडाईचा शहर महिला आघाडी अध्यक्षा सीमाताई बागले, मंदाकिनी गायकवाड, संजय सरक, कैलास तिरमले, प्रमोद सूर्यवंशी, सलीम शहा, सुवर्णा पाटील, आनंदा मोरे, किशोर गिरासे, शिवाजी कोळी, रेखा भाई, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *