मुरबाड नगर राष्ट्रीय महामार्गावर इंदे येथे दोन कार वर वडाचे झाड कोसळले

793

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड नगर राष्ट्रीय महामार्ग 61 वर आज सकाळी इंदे गावाजवळ महामार्गावरून जाणाऱ्या WagonR व स्विफ्ट कार वर महामार्गालगत असलेले वडाचे झाड कोसळल्याने या दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प होती. उंबरोली येथील रस्ता सुरक्षा पोलीस कर्मचारी वर्गाने घटनास्थळी येऊन वाहतूकीस अडथळा ठरणारे हे झाड त्वरीत बाजूला काढल्याने तासाभरात वाहतुकीसाठी महामार्ग खुला करण्यात यश आले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *