निरा नरसिंहपुर,इंदापूर :पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे ई व्ही एम मशीन नागरिकांना प्रात्यक्षिक दाखवत असताना कर्मचारीवर्ग व आधिकारी

निरा नरसिंहपुर,इंदापूर :पिंपरी बुद्रुक येथे मतदार नागरिकांमध्ये ईव्हीएम मशीन बाबत माहितीपूर्ण जनजागृती 

714
            निरा नरसिंहपुर,इंदापूर : (प्रतिनिधी,बाळासाहेब सुतार) – तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथे आज मतदार नागरिकांमध्ये ईव्हीएम मशीन बाबत माहितीपूर्ण जनजागृती  मोहीम रावाबविण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुक 2019  लक्षात घेता ईव्हीएम मशीनची  माहिती मतदार नागरिकांना देण्यात आली. यावेळी उपस्थित मतदारांना प्रात्यक्षिक दाखवून माहिती देण्यात आली.
पिंपरी बुद्रुक मधील तुळजाभवानी माता मंदिर येथे सदर मशीन बद्दल मतदान कसे करायचे याची प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. यावेळी गावकामगार तलाठी बी .एस तीकोटे, कोतवाल दिलीप ठोकळे,
तलाठी शिवाजी बिराजदार, पोलीस हवलदार राखुंडे यांनी  पिंपरी आणि पिंपरी परिसरातील प्रत्येक गावांमध्ये भेट देऊन ईव्हीएम मशीनची नागरिकांना माहिती दिली. बाळासाहेब घाडगे, भाऊ रंधवे, अनिल पाटील दादा शेख, बापू सूर्यवंशी, हिरालाल आतार, हनुमंत पाटील, आप्पा पाटील, युवराज गायकवाड व पिंपरी बुद्रुक मधील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *