जांबुत,शिरूर : जांबुत येथे तालुका स्तरीय शालेय खो खो स्पर्धा 2019  संपन्न 

1126
      जांबुत,शिरूर : ( देवकीनंदन शेटे,संपादक) – तालुक्यातील जांबुत येथे तालुका स्तरीय शालेय खो खो स्पर्धा 2019 आज दि. ५ ला संपन्न झाल्या.  दि.  3 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर अशा ३ दिवस या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात व शांततेत पार पडल्याचे येथील आदर्श इंग्लिश स्कुलचे संथापक अध्यक्ष डॉ.शिवाजी जगताप व सांसद आदर्श ग्राम जांबुतच्या सरपंच डॉ.जयश्री जगताप यांनी सा.समाजशिलशी बोलताना सांगितले. आज या शालेय स्तरीय खो खो स्पर्धांची सांगता झाली. कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक म्हणून ई फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक तथा पुण्याचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य संतोष येवले व क्रीडाशिक्षक तानाजी फुलमाळी व सहका-यांनी या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी महत्वपूर्ण परिश्रम घेतले.
      या खो खो स्पर्धेत 14 वर्ष मुलांच्या गटात रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लीश स्कूल मलठण शाळेने प्रथम क्रमांक,न्यू इंग्लीश धामारी द्वितीय क्रमांक तर न्यू इंग्लीश स्कूल ईनामगाव शाळेने ३ रा क्रमांक पटकावला.
तसेच 14 वर्ष मुलींच्या खो खो स्पर्धेत शिरूरच्या न्यू इंग्लीश स्कूलने प्रथम क्रमांक,वढू बुद्रुक येथील शरदचंद्र पवार विद्यालयाने व्दितीय तर न्यू इंग्लीश स्कूल कवठे येमाई  शाळेने ३ रा क्रमांक पटकावला.
17 वर्ष मुलांच्या खो खो स्पर्धेत जातेगाव येथील छत्रपती संभाजीराजे विद्यालयाने प्रथम, विध्याधाम प्रशाला शिक्रापूर व्दितीय तर वडगाव रासाई येथील शाळेने ३ क्रमांक मिळविला.17 वर्ष मुलींच्या गटात श्री भैरवनाथ विद्यालय पाबळने प्रथम क्रमांक, प्रगती हायस्कूल मुखईने व्दितीय क्रमांक
तर तळेगाव ढमढेरे येथील गुजर प्रशालेने ३ क्रमांक मिळविला.
 १९ वर्ष मुलांच्या खो खो स्पर्धेत  जातेगाव येथील छत्रपती संभाजी राजे विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळविला. पाबळाच्या श्री भैरवनाथ विद्यालयाने व्दितीय क्रमांक तर जांबूतच्या आदर्श विद्यायाने  तिसरा क्रमांक मिळविला.
19 वर्ष मुलींच्या गटात श्री भैरवनाथ विद्यालय पाबळने प्रथम क्रमांक,आदर्श विद्यालय जांबुतने व्दितीय क्रमांक तर न्यू इंग्लीश स्कूल मलठणच्या मुलींनी तिसरा क्रमांक पटकावला.
  या शालेय स्तरीय  खो खो स्पर्धा पाहण्यासाठी जांबुत व परिसरातून तीन दिवस प्रेक्षकांनी मोठाच प्रतिसाद देत खेळाडूंना प्रोत्साहित केले. स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *