निघोज,अहमदनगर : निघोज व परीसरातील विदयुतपंपांचे वेळापत्रक त्वरित दिवसा करा – शिवबा संघटनेची मागणी,अन्यथा या प्रश्नी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

859
          निघोज,अहमदनगर : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – निघोज व परीसरातील विदयुतपंपांचे वेळापत्रक त्वरित दिवसा करण्याची मागणी परिसरातील शेतक-यांच्या वतीने व शिवबा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.शेतक-यांचा हा महत्वपूर्ण प्रश्न तातडीने मार्गी लागला नाही तर या प्रश्नी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवबा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
  निघोज परीसरात गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याचा मोठाच वावर वाढला आहे. नुकतीच वडनेर बुद्रुक परीसरात बिबटयाच्या हल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.वनविभागाकडे मागणी करून हि बिबट्यांच्या बंदोबस्त करण्याकामी दुर्लक्ष करण्यात येतअसल्यानेच अशा घटना घडतात. प्रशासनाच्या या प्रवृत्तीचा शिवबा संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे.बिबटयांच्या वावराने परीसरात प्रचंड दहशत पसरली आहे.शिरसुले,वडनेर,वाजेवाडी,देविभोयरे व अनेक परीसरात शेतकर्यानी बिबट्या पाहिला आहे. बिबटयांच्या दहशत व भितीमुळे संध्याकाळी ७ वाजताच परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांना घराचे दरवाजे बंद करावे लागत आहेत.
अशातच महावितरणने विदयुत पंपाची लाईट रात्री करून समस्यात आणखीनच वाढ केली आहे. यासंदर्भात माहितीसाठी निघोज येथील महावितरणच्या कार्यालयात  गेल्यानंतर अधिकारी देखील उपलब्ध नसतात. मग दाद मागायची कोणाकडे ? याठिकाणी कायमस्वरूपी सक्षम अधिकारी नियुक्त असायला हवा परंतु अनेक दिवसापासून हि खुर्ची खालीच आहे.
विद्युत पंपांना दिवसा वीज मिळण्यासाठी तहसील,फॉरेस्ट,ग्रामपंचायत चे पत्र लागते असे सांगण्यात आले. त्यानुसार शिवबा संघटनेच्या वतीने तहसील व फॉरेस्टच्या कार्यालयाला तातडीने पत्र विज मंडाळाला देण्यासाठी विनंतीचे पत्र देण्यात आले आहे  तसेच नामदार विजयराव औटी,उपाभियंता पारनेर,कार्यकारी अभियंता अहमदनगर यांना ही या संदर्भातील पत्र देण्यात आले आहे.शेतकऱयांच्या दृष्टीने ही अत्यंत गरजेची मागणी आहे. यावर महावितरणने तातडीने विचार केला नाही व विद्युत पंपांना दिवसा वीज उपलब्ध करून दिली नाही तर मात्र सर्व परीसरातील शेतकरी वर्गाला बरोबर घेउन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांनी दिला आहे.
सबंधिताना देण्यात आलेल्या निवेदनावर शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे,शंकर पाटील वरखडे,गणेश लंके,राजु भाऊ लाळगे,खंडु लामखडे,नवनाथ बरशिले,स्वप्नील लामखडे,विशाल खैरे,निलेश वरखडे,निलेश लामखडे,विश्वास शेटे,राहुल शेटे,अंकुश वरखडे,लहु गागरे,नवनाथ लामखडे,दिलीप कवाद,हौशाभाउ शेटे,मच्छिंद्र लाळगे,मिनीनाथ कवाद,पोपट वरखडे,रोकडे भाऊ, एकनाथ शेटे,अविनाश लामखडे,दत्ता रासकर,दादाभाऊ रसाळ,राजु लंके,संदीप कवाद,अनिल लामखडे,विठ्ठल लामखडे इत्यादी  शिवबा संघटनेतील सहकाऱ्यांच्या सह्या आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *