कवठे येमाई,शिरूर : आमदार दिलीपराव वळसे पाटील – दूरदृष्टी असलेला नेता व शिरूर-आंबेगावच्या विकासाचा खरा महामेरू, एक सक्षम व अश्वासक राजकीय नेतृत्व 

1427

 कवठे येमाई,शिरूर : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : शिरूर -आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे भाग्य विधाते ठरलेले व राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदाची धुरा प्रभावीपणे सांभाळणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार दिलीप वळसे पाटील हे या मतदार संघात गेल्या ३० वर्षांपासून अतुलनीय व अभेद्य असे काम करीत असल्याने या मतदार संघात त्यांनी केलेल्या भरीव विकास कामांमुळे त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत आव्हान निर्माण करेल असा विरोधकांमधून कुठलाच पर्याय सध्यातरी दिसत नाही. आपल्या मतदार संघातील गाव गावातील सर्व सामान्य कार्यकर्त्यांशी सातत्याने आपुलकीने थेट संपर्क ठेवणारे वळसे पाटील अनेक कार्यकर्त्यांना आपलेसे वाटतात.विरोधी पक्षात असून ही वळसे पाटील यांनी मतदार संघातून गेल्या पाचवर्षात त्यांच्याकडे जनतेकडून सुचविण्यात आलेल्या कामांचा सरकारकडे पाठपुरावा करून ते सोडविण्याचा नव्हे मार्गी लावण्याचा प्रयत्न ठेवला आहे. प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव व त्यातून समाजकारण कसे करावे याचे उत्तम उदाहण म्हणजे आमदार दिलीप वळसे पाटील हे होत.आपल्या मतदार संघातील सर्वागींण विकासाच्या बाबतीत सातत्याने दुरदृष्टी ठेवत आंबेगावच्या आदिवासी भागापासून ते शिरूर तालुक्यातील ३९ गावांतील  सर्वार्थाने कायापालट करणारे अभ्यासू नेते म्हणून आमदार दिलीपराव वळसे पाटील हे सर्व परिचित आहेत. स्वातंत्रोत्तर काळापासून अनेक लोकप्रतिनिधींनी या भागाचे नेतृत्व केले.   पण आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे वाखाणण्याजोगे काम कोणाकडून ही न झाल्याचे पूर्वीच्या या भागातील लोकप्रतिनिधींच्या केलेल्या कामाचा आढावा घेतल्यास लक्षात येते.

वडील माजी आमदार सहकार महर्षी कै. दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांच्याकडून राजकीय पटलावरील कार्याचे बाळकडू घेत आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी आपल्या राजकीय क्षेत्रात श्रीगणेशा केला.विद्यार्थी जिवनापासूनच वळसे पाटील यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली. उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिलीप वळसे-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  व  ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरवात केली. राजकारणाचे खरे धडे त्यांना तेथेच मिळाले. राज्यभर फिरून त्यांनी महाराष्ट्र जाणून घेतला. १९९० साली आंबेगाव तालुक्‍यात युवा नेतृत्व म्हणून दिलीप वळसे-पाटील यांचा उदय झाला. वडील सहकारमहर्षी दत्तात्रेय गोविंदराव वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाचा श्रीगणेशा केला. त्यावेळी जनता दलाचे खासदार असलेले किसनराव बाणखेले यांचा तालुक्‍यावर प्रभाव होता. मात्र, १९९० च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून वळसे-पाटील यांनी बाणखेले यांचे गुरू अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना पराभूत केले. त्यानंतर आजपर्यंत सलग सहा वेळा विजय मिळवून गेली तीस वर्षे या मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करीत आहेत . युतीचे सरकार असताना विधानसभेत चमकदार कामगिरी केल्याने त्यांना उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार मिळाला. ऊर्जा विभागासारखे महत्त्वाचे खाते त्यांच्याकडे होते. त्यानंतर मिळालेल्या अर्थखात्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली.

आपल्या मतदार संघातील ऊस उत्पादक शेतकर्यांच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरलेल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष म्हणून उत्तर पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील दत्तात्रयनगर (पारगाव) येथे सहकारी साखर कारखाना उभारून आपल्या कल्पक नेतृत्वाने सर्वांना विश्वासात घेत अगदी थोड्याच कालावधीत या कारखान्याला प्रगतीपथावर नेत या परिसरात वळसे पाटील यांनी केलेली सर्वागींण उत्कर्षवर्धक क्रांती आपणा सर्वांना ज्ञात आहेच. शिरूर- आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील विविध दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे असणारे रस्ते,पाणी,वीज,शेतकऱयांना वरदान ठरलेले ओढे व नद्यांवरील बंधारे, कॅनाल, तळी,नाले, गावोगावच्या पाणीपुरवठा योजना, नागरिकांसाठी अत्यावश्यक असणारी सभागृहे,समाजमंदिर,तरुणांना व्यायामाचे महत्व समजावे म्हणून अनेक गावात केलेली अद्ययावत व्यायाम शाळांची उभारणी, मतदार संघातील गरीब, गुणवान व सर्वसामान्य विद्यार्थ्यांना  जवळ चांगल्या उच्च शिक्षणाची सोया व्हावी म्हणून अनेक शैक्षणिक संस्था उभारणीत वळसे पाटील यांनी योगदान दिले आहे. सार्वजनिक आरोग्य सेवेच्या दृष्टिकोनातून अनेक गावातून त्यांनी सुरु केलेली सार्वजनिक आरोग्य केंद्रे अशी एवढीच नाही तर हजारो विधायक कामे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी सामाजिक दृष्टिकोनातून आजपर्यंत मार्गी लावली आहेत.       आपल्या मतदार संघातील कार्यक्षेत्रातील गावा गावातून प्रत्यक्ष भेटी देत तेथे अत्यावश्यक असणाऱ्या व सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या असणा-या समस्या,गरजा यांचा सखोल अभ्यास करून त्या शक्य होईल तेव्हढ्या तत्परतेने मार्गी लावण्याचा आमदार दिलीप वळसे पाटील यांचा सातत्याने प्रयत्न सुरु असतो. अगदी सर्व सामान्यांच्या प्रती वळसे पाटील यांच्याकडे असणारा जिव्हाळा व आपुलकीची भावना यामुळे आमदार दिलीप वळसे पाटील आज अल्पावधीत सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यांच्याकडे असणारे कल्पक नेतृत्व,प्रगढ विचार व कार्यकुशल पद्धतीने काम करण्याची त्यांची पद्धत यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ते लीलया जिंकतील व राष्ट्रवादीचा शिरूर- आंबेगावचा गड निश्चितपणे राखतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांतून पाहावयास मिळत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *