वाडा,पालघर : वाड्यातील  गणेशोत्सवात माहेरवाशिणींचा प्रेरणा पुरस्कार देऊनगौरव; हळदी कुंकू समारंभाचेही आयोजन 

625

वाडा,पालघर : (प्रतिनिधी,संजय लांडगे) – तालुक्यातील चिंचघरपाडा येथील एकता मित्रमंडळाच्या रौप्य महोत्सवी गणेशोत्सव समारंभामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या माहेरवाशीण महिलांचा राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या हस्ते  प्रेरणा पुरस्कार देऊन  गौरव करण्यात आला. तर माहेर व सासरवाशीण महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करून नात्याची वीण घट्ट करण्याचा प्रयत्न मंडळाने केला.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील म्हणाले कि, एकता मित्र मंडळाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रम हे खरोखरच कौतुकास्पद असून इतर मंडळांसाठी प्रेरणा देणारे आहे. हळदीकुंकू समारंभात नव्या माहेरवाशीणींपासून वयोवृद्ध माहेरवाशीण महिलांनी मोठ्यासंख्येने सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त एकता मित्र  मंडळाने विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक संदेश देण्याचा प्रतत्न केला असून गणेशोत्सवात विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमादरम्यान जेष्ठ पत्रकार अशोक पाटील, आदर्श शिक्षिका रोशनी भोईर, समृद्धी भोईर, निकिता पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी  शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, तालुका प्रमुख उमेश पटारे, महिला आघाडीच्या तालुका संघटक रेश्मा पाटील, युवा सेनेचे सचिन पाटील व भावेश पष्टे आदी मान्यवर उपस्थित होते.

गेल्या पंचवीस वर्षाच्या काळात मंडळाने विविध सामाजिक उपक्रम राबवले. हे वर्ष रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने महिला, विद्यार्थी यांचा ५ दिवसांत सहभाग वाढविण्याबरोबरच सामाजिक संदेश देणारे वेगवेगळे उपक्रम राबविले असल्याचे एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष वसंत भोईर यांनी सा.समाजशीलशी बोलताना सांगितले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *