टाकळी हाजी,शिरूर : माळवाडी येथील महात्मा ज्योतीबा फुले पतसंस्थेची प्रगती कौतुकास्पद – आमदार दिलीप वळसे पाटील, येथील विठ्ठल रुक्मिणी मंदीराच्या सभागृहाचे भूमीपूजन संपन्न 

630

  टाकळी हाजी,शिरूर : (ब्युरो रिपोर्ट) – माळवाडी टाकळी हाजी (ता.शिरुर ) येथील महात्मा ज्योतीबा फुले ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी भेट देवून संस्थेच्या कामकाजाची पाहणी केली.यावेळी त्यांनी संस्थेमधील ठेवी व कर्जवाटप व संस्थेची वसुली ,भाग भांडवल ,नफा व लेखापरीक्षकाकडून मिळणारा ऑडिट वर्ग ‘अ’ अशी सर्व परिस्थिती पाहून त्यांनी संस्थेचे अध्यक्ष सोपानराव भाकरे व उपाध्यक्ष जयवंतराव भाकरे तसेच सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले.
माळवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदीराच्या सभागृहाच्या उदघाटन प्रसंगी आले असता त्यांनी संस्थेस भेट दिली. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे ,मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम ,घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे ,रंगनाथ थोरात  ,जि.प.सदस्या सुनिताताई गावडे,सभापती विश्वास कोहकडे , पं.स.सदस्या अरुणाताई घोडे,सरपंच दामूशेठ घोडे ,प्रभाकर गावडे,संपतराव पानमंद ,रखमा निचित ,महात्मा फुले युवा मंचचे अध्यक्ष अविनाश भाकरे,चांदाशेठ गावडे,जेष्ठ पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे,पत्रकार संजय बारहाते,पत्रकार सतीश भाकरे आनंदा भाकरे,संतोष भाकरे, विठ्ठल भाकरे , डाळिंब बागायतदार पोपटशेठ रसाळ  ,भाऊसाहेब भाकरे ,दत्ताञय भाकरे  ,भाऊसाहेब पांढरकर ,मच्छिंद्र भाकरे ,काशिनाथ भाकरे ,युवा नेते संतोष बाळासाहेब भाकरे ,व्यवस्थापक शंकर भालेराव ,उपव्यवस्थापक भाऊसाहेब गाडीलकर ,नाथा भाकरे ,नवनाथ भाकरे ,राहूल भाकरे ,सोमनाथ भाकरे ,गुरुदास भाकरे ,नाथा भाकरे ,लहू भाकरे ,संतोष कानडे ,अमोल भाकरे ,संदीप भाकरे ,रामदास भाकरे ,पांडूरंग निचित ,शांताराम उचाळे ,पोपट गावडे,बाळू भाकरे आदी मान्यवर यावेळी उपस्थितीत होते.
यावेळी मुख्याध्यापक शिवाजी वरखडे व प्रभाकर गावडे यांचा सन्मान करण्यात आला .या कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुञसंचालन प्रकाश भाकरे यांनी केले तर आभार राहूल भाकरे यांनी मानले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *