दोंडाईचा,धुळे : महादेवपुरा परीसरातील गणरायांना ९ व्या दिवशी वाजत गाजत निरोप

447
         दोंडाईचा,धुळे : (प्रतिनिधी, समाधान ठाकरे) –  ”गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” च्या गजरात शहरातील महादेवपुरा परिसरातील गणरायांना आज नवव्या दिवशी वाजत गाजत निरोप देण्यात आला. बापजी ग्रुप, जय शिव शंकर गणेश मित्र मंडळ, जय श्रीराम गणेश मित्र मंडळ, जय भवानी गणेश मित्र मंडळ या मंडळांनी नवव्या दिवशी गणरायांना मोठ्या उत्साहात निरोप दिला.यावेळी परिसरातील महिला व तरुणींनी उत्साहात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
नवव्या दिवशी आरतीचा मान दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व बेहड गावाचे सरपंच रावसाहेब पैलवान यांना देण्यात आला होता. तसेच या परिसरातील विद्यमान आरोग्य सभापती नरेंद्र गिरासे, शिक्षण सभापती नरेंद्र होळी, मा. बांधकाम सभापती निखिल जाधव, शिवसेना शहर अध्यक्ष चेतन राजपूत पंकज चौधरी, पंकज चोळके, संदीप ठाकूर, सरजू नाईक, रोहित ठाकूर, भुषण महाजन, बापू राजपूत, विक्की कोळी, नितीन मराठे, मधू चौधरी, प्रशांत वाणी,  बापुजी मिस्तरी, सोनू कोळी, गोलू चौधरी, गुलाब पवार, आण्णा पाटील, विशाल बडगुजर, मोन्टी कोळी, मुकेश कोळी, महादेवपुरा परीसरातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने उत्साहात सहभाग घेतला होता.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *