शरदवाडी,शिरूर : जि प प्राथमिक शाळा शरदवाडी (जांबुत) येथे वह्या वाटप

579

शरदवाडी,शिरूर : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) –  घणसोली बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट, नवी मुंबई यांचे वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय बाजीराव बिरामणे यांचे उपस्थितीत, संस्थेचे कार्यवाहक जयसिंग औटी यांचे प्रेरणेने,एकनाथ बबन निचित यांचे हस्ते वह्या तसेच शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम जि प प्राथ शाळा शरदवाडी (जांबुत) या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक  नवनाथ निचित यांनी दिली.

या कार्यक्रमासाठी जांबुत गावाचे मा​जी ​ उपसरपंच गणेश सरोदे मा.ग्रा सदस्य  हरिभाऊ सरोदे, मा.ग्रा सदस्य  रामकृष्ण सरोदे,डाॅ. पोपट गांजे​,ज्ञानेश्वर गांजे,भागाशेठ सरोदे, दगडू सरोदे, किसन गांजे, बाळू सरोदे, जानकू सरोदे, महेश सरोदे अनेक मान्यवर उपस्थित होते. शाळेच्या वतीने​ ​रमेश नवले यांनी सर्वांचे आभार मानले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *