काठापूर,शिरूर : विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना काठापुर मधून भरघोस मताधिक्य देणार – बिपीन थिटे

625

         काठापूर,शिरूर (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – विधानसभेचे माजी अध्यक्ष​ आमदार दिलीप वळसे पाटील यांनी काठापुर खु येथे भरघोस निधी देवून काठापूर गावचा कायापालट केल्याने काठापुर खु  गाव येणाऱ्या विधानसभेला ​त्यांना ​मोठे मताधि​क्य ​ देणार असल्याचे सरपंच बिपीन थिटे यांनी सांगितले .
काठापुर खु येथे विविध विकासकामांचे भुमिपूजन व उदघाटन समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील ,माजी आमदार पोपटराव गावडे ,मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम,प्रकाश पवार ,घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे ,जि.प.सदस्या सुनिताताई गावडे, सभापती विश्वास कोहकडे ,शिरुर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पांचुदकर ,पंचायत समिती सदस्या अरुणाताई घोडे ,किसन उंडे,माजी सरपंच भाऊसाहेब औटी ,उपसरपंच वंदना दाते ,रंगनाथ होळकर ,मुख्याध्यापक संपत पोखरकर ,प्रविण चासकर ,यशवंत दिघे ,नरेश ढोमे ,रामदास दाते,सोमनाथ औटी आदि मान्यवर यावेळी उपस्थितीत होते.
काठापुर खु येथे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी १ कोटी ९० लाख रुपयांचे विकासकांचे उदघाटन व भुमिपूजन यावेळी करण्यात आले असून एवढ्या छोट्याशा गावात एवढा मोठा निधी मिळवून दिल्याने विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना विधानसभेला मोठे मताधिक्कय देणार असल्याचे सरपंच बिपीन थिटे यांनी सांगितले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *