पिंपरखेड,शिरूर :  शेतकऱ्यांच्या महत्वपूर्ण पाणी प्रश्नासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांचा इशारा 

453

        पिंपरखेड,शिरूर (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) –  भविष्यात पाणीप्रश्न गंभीर बनत असून हे शासन कुकडीची कार्यालये नगर जिल्ह्यात स्थलांतरीत करीत असून त्यासाठी आपण मोठा जनसंघर्ष उभारणार असल्याचे ​व प्रसंगी याप्रश्नी रस्त्यावर उतरण्याचा  मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी ​दिला आहे.
पिंपरखेड (ता.शिरुर ) येथे  विधानसभेचे माजी अध्यक्ष​ आमदार ​ दिलीप वळसे पाटील यांचा गाव​ ​भेटदौरा व विविध विकासकामांचे उदघाटन व भूमिपुजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.यावेळी  विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील ,माजी आमदार पोपटराव गावडे ,मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम ,घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे ,भीमाशंकरचे संचालक प्रदीप वळसे ,प्रकाश पवार ,जि.प.सदस्या सुनिताताई गावडे, सभापती विश्वास कोहकडे ,शिरुर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पांचुदकर ,पंचायत समिती सदस्या अरुणाताई घोडे ,किसन उंडे,अमोल जगताप ,दिलीप लोखंडे ,माजी सरपंच भाऊसाहेब औटी ,दामोदर दाभाडे ,रामदास दरेकर ,शरद बोंबे ,रामदास ढोमे ,निवृत्ती बोंबे ,माऊली ढोमे ,किशोर दाभाडे ,नरेश ढोमे ,आमितभाई पठाण ,संदीप वरे ,संतोष ढोमे आदि मान्यवर यावेळी वळसे उपस्थितीत होते.
यावेळी निकम म्हणाले की ,विधानसभेचे माजी अध्यक्ष ​आमदार ​दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून पिंपरखेड येथे मोठ्या प्रमाणात  विकासकामे झाली असून भविष्यातदेखिल  या भागाचा विकास करण्यासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आव्हान निकम यांनी केले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *