महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ मुरबाडच्या वतीने शिक्षक संघ नेते स्व.आमदार शिवाजीराव पाटील यांना प्रथम स्मृतिदिनानिमित्त अभिवादन 

431
         मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ मुरबाडच्या वतीने शिक्षक संघ नेते स्व.आमदार शिवाजीराव पाटील यांना प्रथम स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.शिवाजीराव पाटील यांच्या संघटनात्मक कार्याचा वारसा प्राथमिक शिक्षक संघ या पुढे चालू ठेवणार असे प्रतिपादन तालुका अध्यक्ष सोमनाथ सुरोशे यांनी यावेळी केले.
           स्वर्गीय आमदार शिवाजीराव पाटील यांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी जि.प.शाळा मुरबाड नं.2 येथे सकाळी 11 वा.प्रथम स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
          राज्यभर ते शिक्षक नेते शि. द. पाटील या नावाने परिचीत होते. त्यांचे निकटवर्तीय त्यांना ‘शि. द. अण्णा” या नावाने ओळखायचे. अखिल भारतीय शिक्षक संघाचे नेते म्हणून देश पातळीवर त्यांनी अत्यंत प्रभावी काम केले. त्यांनी १९७५ ते १९९४ या कालावधीत राज्याच्या शिक्षक संघाचे अध्यक्ष म्हणून काम करताना शिक्षकांची संघटना बांधली. त्यांच्या संघटना बांधनीच्या कौशल्यामुळेच त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. शिक्षकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले आहे,असे विचार जिल्हाध्यक्ष भगवान भगत यांनी व्यक्त केले.तसेच सुमन पाटील,रविंद्र मोहपे,दीपक पाटोळे,योंगेंद्र बांगर ,यशवंत माळी,यांनी त्यांच्या कार्याविषयी आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जयवंत मुरबाडे,होते .तसेच ज्येष्ठ शिक्षक गजानन पठारे,तानाजी जाधव,रघुनाथ इसामे,अशोक सोनवणे .प्रहार दिव्यांग संघटनेचे काशिनाथ राऊत उपस्थित होते.तसेच कार्यक्रमासाठी सुनिल देशमुख ,भरत भांडे,विष्णू पारधी,गोल्हे,पद्माकर घागस,रविंद्र घरत,कांचन चौधरी,केतना ठाकरे,रंजना डोहळे,आकांक्षा पवार,शुभांगी पवार यांनी पुढाकार घेतला.तालुका सचिव शैलेश इसामे यांनी आभार मानले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *