पिंपरी चिंचवड,पुणे : जेष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा स्वप्नापलीकडचा क्षण – अवधुत गुप्ते 

548
        पिंपरी चिंचवड,पुणे : (प्रतिनिधी,राजाराम गायकवाड) – अखिल भारतीय नाट्य परिषद चिंचवड शाखा,कलारंग प्रतिष्टान,सिध्दीविनायक गुप यांच्या  सयुक्त विद्यमाने संगीत क्षेञात दिला जाणारा पुरस्कार संगीतकार अवधुत गुप्ते यांना काल दि. १४ ला समारंभपूर्वक देण्यात आला .यावेळी जेष्ठ  संगीतकार ह्दयनाथ मंगेशकर, चिञपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले,महाराष्ट्र साहित्य प्रसारणीचे अध्यक्ष सचिन इटके,कोथरुड शाखेचे सुनिल महाजन,तळेगाव दाभाडे शाखेचे सुरेश धोञे,कृष्णकुमार गोयल, चाफेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरिष प्रभुणे, गौरी घंटे, सचिन सावंत ,अवधुत गुप्ते यांच्या आई गंगाबाई गुप्ते,  नाट्य परिषद शिरुर शाखेच्या अध्यक्षा दिपाली शेळके ,कार्यकारिणी सदस्य राजाराम गायकवाड, कोषाध्यक्ष समाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शेळके,रुपाली ढमढेरे, शिवाजीराव मांढरे, संजय  पोळ, याबरोबर चिंचवड, शिरुर ,तळेगाव दाभाडे शाखेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
     पिंपरी चिंचवड नाट्य शाखेचे अध्यक्ष  भाऊसाहेब भोईर यांनी प्रस्ताविक केले.  या शाखेने १८ वर्षात अनेक संगीतकारांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.  यापुढे हे कार्य असेच दिर्घकाळ सुरु राहणार असल्याचे सांगितले. यावेळी रोख १ लाख ११ हजार रुपये ,शाल,श्रीफळ,पगडी देऊन गुप्ते यांना सन्मानित करण्यात आले.  गुप्ते यांनी नुकत्याच कोल्हापूर ,सांगली येथील महापुरात सापडलेल्या पुरग्रस्थांची जाणीव ठेवत मिळालेली पुरस्काराची  सगळी रक्कम पुरग्रस्थांना देण्याचे जाहीर केले. यावेळी अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली.  यावेळी शिरुर तालुका नाट्य परिषदेच्या वतीने संगीत क्षेञात पुरस्कार मिळाल्याबद्दल दिपालीताई शेळके व पदाधिकारी सदस्यानी गीतकार अवधुत गुप्ते यांचे अभिनंदन केले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *