मांडवगण फराटा,शिरूर : फराटे पाटील फार्मसी महाविद्यालयामध्ये व्यसनमुक्ती अभियान संपन्न 

603
      मांडवगण फराटा,शिरूर : (ब्युरो रिपोर्ट) – मांडवगण फराटा येथील श्री वाघेश्वर ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित दादा पाटील फराटे फार्मसी महाविद्यालयात नूतन विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभानिमित्त “तंबाखूमुक्त अभियान” राबविण्यात आले.
     व्यसनमुक्तीसाठी युवा पिढीमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे,हे या अभियानांतर्गत दिसून येते.धुम्रपान करणे,हे आरोग्यासाठी हानिकारक आहे,त्यामुळे आपल्या जिवाला धोका निर्माण होतो.धुम्रपान ही एक अशी सवय आहे कि जी आपले पूर्ण जीवन उध्वस्थ करून टाकते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर सारखे आजार होतात.बिडी,सिगारेट,ड्रग्ज,दारू यांसारख्या व्यसनांच्या आधीन होणे,म्हणजे मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखे आहे असे महत्वपूर्ण संदेश या कार्यक्रमातून देण्यात आले.तंबाखूचे दुष्परिणाम सांगून तंबाखू नियंत्रण कायद्याबाबत भिंतीपत्रक लावण्यात आले.”एक दो एक दो ,बिडी, सिगारेट छोड दो”, आता करा एकच काम बिडी सिगारेट राम राम,”आता करा एकच नारा करूया तंबाखूमुक्त परिसर सारा” असे नारे देत नवीन विद्यार्थ्यांनी तंबाखूमुक्त अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.यावेळी महाविद्यालयात नच्यने प्रवेश घेतलेले160 विद्यार्थी व इतर असे सर्व 245 विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष राजीव फराटे पाटील, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर फराटे पाटील, सचिव मृणालताई फराटे पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.हेमंत कांबळे,प्रा.विवेक सातपुते,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.अविनाश ढोबळे व इतर सर्व प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *