कवठे येमाई,शिरूर : कवठे येमाईत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून ९४ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात, ग्रामस्थांना मिळणार स्वच्छ पिण्याचे पाणी,पं.स. सदस्य डॉ.सुभाष पोकळे व ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याला यश 

598
       कवठे येमाई,शिरूर : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावठाणातील ग्रामस्थांना लवकरच आता शुद्ध पाणी पिण्यास मिळणार आहे. गावठाणासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून ९४ लाख ४४ हजार रुपयांच्या या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ आज जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते किसाप्पा पळसकर व मान्यवर ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला असल्याची माहिती सरपंच अरुण मुंजाळ यांनी दिली.
          लोकसंख्येच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या कवठे येमाई गावात पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून शिरूर पंचायत समितीचे शिवसेनेचे सदस्य डॉ.सुभाष पोकळे सरपंच अरुण मुंजाळ व ग्रामपंचायत प्रशासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना सुरु व्हावी म्हणून सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरु ठेवला होता. अखेर या योजनेला प्रशासकीय मान्यता व कामाचे टेंडर ही झाल्याने या कामास आज प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी शिरूर पंचायत समितीचे सदस्य डॉ. सुभाष पोकळे, किसन पळसकर,अर्जुन सांडभोर,हिरानाना इचके,माजी उपसरपंच बबन वागदरे,अर्जुन मुखेकर, बबुशा कांदळकर,पोपट घोडे,मिटुशेठ बाफना,फक्कड सांडभोर,मारूती वागदरे,लहु वागदरे,डाॅ.कुंडलिक शितोळे,हौशिराम मुखेकर,रोहिदास हिलाळ,विजय गांधी,रितेश शहा,बाबू खाडे व मान्यवर ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
           आगामी काळात ही योजना पूर्ण झाल्यानंतर गावठाणातील नागरिकांना या योजनेतून शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असल्याने नागरीकांचे आरोग्य ही चांगले राहण्यास नक्कीच मदत होणार असल्याचे डॉ.पोकळे यांनी सांगितले



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *