मळगंगा देवी मंदिरात घटस्थापना मोठया उत्साहात,अखंड हरीनाम सप्ताहाच्या कार्यक्रमास आज सुरवात  

461
            टाकळी हाजी,शिरूर (प्रतिनिधी,संजय बारहाते) :- नवरात्र उत्साहाच्या निमित्ताने टाकळी हाजी ता शिरूर येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री क्षेत्र मळगंगा देवी येथे मोठया उत्साहात घटस्थापना करून, अखंड हरीनाम सप्ताहाच्या कार्यक्रमास सुरवात झाली आहे.श्री क्षेत्र मळगंगा देवी ( टाकळी हाजी ) जगप्रसिद्ध रांजणखळगे येथे नवरात्र उत्सहाच्या  निमित्ताने अखंड हरी नाम सप्ताहाचे आयोजन रविवार दि. २९ पासुन करण्यात आले आहे. विना पुजन शिरूर चे उद्योजक देवेद्रशेठ फुलफगर यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, चांदाशेठ गावडे, शिवाजी कांदळकर, सखाराम खामकर, प्रकाश वायसे, सुभाष गावडे, भगवान पांढरकर, देवीदास पवार, शंकर होने, बबन मुसळे, सुभाष भोसले, सोनबा खाडे , बापुसाहेब होने,शंकर घोडे, अतुल मुंजाळ, अशोक गावडे, रोहीदास घोडे, पोलिस पाटील शोभा मंदीलकर, भरत घोडे, मारूती किऱ्हे, सुरेश चक्रे , रोहीदास घोडे, पोपट उचाळे, अंकुश उचाळे,यांच्यासह मोठ्या प्रमानात ग्रामस्थ उपस्थित होते.
      रविवार दि २९ते मंगळवार दि ८ आक्टोबर पर्यन्त विविध किर्तनकारांचे किर्तन होणार असुन, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली .



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *