कनेरसर येथील श्री येमाई देवी दर्शनास येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी ट्रस्ट कडून उत्तम व्यवस्था – दिलीप वळसे पाटील  

497
          मंचर,पुणे : (ब्युरो रिपोर्ट) :- आज घटस्थापना व  शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी  कन्या पूर्वा वळसे पाटील यांच्या समवेत आज कनेरसर (ता.खेड) येथील यमाई देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे व ग्रामस्थ  उपस्थित होते.
आज घटस्थापना, नवरात्रौत्सवास आजपासून सुरवात होत आहे.आश्विन शुद्ध प्रतिपदा या तिथीला देवीच्या घटांची स्थापना केली जाते. नवरात्रीचे नऊ दिवस हा शक्तिदेवीचा कालखंड म्हणूनच ओळखला जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत हा महोत्सव चालतो. हा नऊ रात्रींचा कालखंड म्हणून नवरात्र उत्सव म्हटला जातो.
भारतात अनेक शक्तिस्थाने आहेत. ही स्थाने भक्तिभावाने पुजली जातात. आज पुणे जिल्ह्यातील देवीचे शक्तिस्थान कनेरसर, (ता.खेड) येथे असलेल्या येमाई देवीच्या मंदिरात विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दर्शन घेतले. या देवीचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे. नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रचंड भाविकांची गर्दी या ठिकाणी होती. अगदी शांततेत सर्वजण दर्शनाचा लाभ घेत होते. भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून देवस्थान ट्रस्ट अतिशय नियोजनबद्ध काम करत असल्याची प्रतिक्रिया पूर्वा वळसे पाटील यांनी सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *