आमदार दिलीप वळसे पाटील यांची कवठे येमाईस भेट,देवीचे व गोपाळकृष्णाचें दर्शन घेतले,नागरिकांशी ही संवाद 

971
          कवठे येमाई, शिरूर : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) आंबेगाव-शिरूरचे कार्यकुशल व अभ्यासू आमदार,विधानसभेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार दिलीपराव वळसे पाटील यांनी नवरात्र उत्सवा निमित्त शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ग्रामदैवत श्री येमाई देवी व श्री गोपालकृष्ण देवस्थानला आज सायंकाळी भेट देत दर्शन घेतले. यावेळी शिरूरच्या पश्चिम भागातील अनेक गावातील ग्रामस्थांनी वळसे पाटील यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दिला.
     कवठे येमाई येथील जागृत देवस्थान श्री येमाई देवीच्या दर्शनासाठी आलेले आमदार वळसे पाटील यांनी आवर्जून देवीचा ओलांडा व आरती घेत देवीचे आशीर्वाद घेतले. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे,राजेंद्र गावडे,आंबेगाव शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील, टाकळी हाजीचे सरपंच दामुअण्णा घोडे, माजी सरपंच दीपक रत्नपारखी,बाजीरावा उघडे,आर के मोमीन, मलठणचे संदीप गायकवाड, राजेश सांडभोर,दत्ता सांडभोर,सुरेश रोहिले,मिठूलाल बाफणा,डॉ.विकास शेटे,बाळासाहेब डांगे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मान्यवर पदाधिकारी व वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     गावातील श्री गोपालकृष्ण देवस्थानाला दिलीप वळसे पाटील यांनी भेट देत भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले यावेळी उपस्थित  नागरिकांशी वळसे पाटील यांनी संवाद साधला.तर माजी आमदार पोपटराव गावडे यांनी शिरूर तालुक्यातील ३९ गावातील जनता वळसे पाटील यांच्या पाठीमागे भक्कम उभी राहील. वळसे पाटील यांच्या सारखा नेता राज्याच्या पातळीवर नव्हे तर देशपातळीवर प्रभावीपणे काम काम करीत असल्याने शिरूरमधून अधिकाधिक मतांची आघाडी देण्याचा आम्ही सर्वच जण प्रयत्न करणार असल्याचे गावडे यांनी सांगितले.तर कवठे येमाई ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच दीपक रत्नपारखी यांनी मागील वेळेपेक्षा यावेळी नक्कीच जास्त मतदान वळसे पाटील यांना देणार असल्याचे सांगितले. वळसे पाटील यांच्या सारखा दूरदृष्टी ठेवून कार्यरत राहणारा व शरद पवार साहेबांचा आदर्श समोर ठेवून लोकाभिमुख कार्य करणारा नेता या भागास लाभल्याने त्यांनी केलेल्या विविध विकासकामांच्या जोरावर मोठ्या मताधिक्याने वळसे पाटील निवडून येतील असा विश्वास ही रत्नपारखी व ग्रामस्थ यांनी व्यक्त केला.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *