पुण्यात सिंहगड पोलीस ठाण्यात पोलीस बांधवांसमवेत दीपोत्सव

304

        पुणे : (प्रतिनिधी,सचिन दांगडे) – आपल्याला सण, उत्सव आनंदात साजरे करता यावेत, यासाठी कर्तव्यदक्ष पोलीस प्रशासन, अग्निशमन दल, स्वछता कर्मचारी अहोरात्र कर्तव्य बजावत असतात. कर्तव्यावर असलेल्या पोलीस बांधवाना दिवाळी सणाचा आनंद देण्यासाठी वंदेमातरम संघटनेचे युवा वाद्य पथक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दीपोत्सव साजरा करण्यात आला. पोलीस बांधवानी प्रज्वलित केलेल्या शेकडो पणत्यांनी आणि रांगोळ्यांनी सिंहगड पोलीस स्टेशनचा परिसर उजळून निघाला. सिंहगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार शेळके, उपनिरीक्षक कणसे साहेब व इतर पोलीस कर्मचारी यांच्यासह युवा वाद्य पथकाचे अनिष पाडेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे, अभिजित बोरा, विकास कांबळे, सागर पानसरे आदी उपस्थित होते. आपल्या सुरक्षितेसाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता म्हणून दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने दीपोत्सव साजरा करतो. यंदा सनसिटी पोलीस स्टेशन सिंहगड रोड येथे हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. या उपक्रमामुळे पोलीस बांधवांना कर्तव्यावर असूनही दिवाळी साजरी केल्याचा आनंद मिळतो, त्याचे आम्हाला समाधान असल्याचे शशिकांत कांबळे यांनी नमूद केले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *