तळेगाव ढमढेरे,पुणे :टाकळी भिमा गावचा सरपंच अद्यापही फरारच, सरकारी कामात अडथळा प्रकरणी दोरगेवर गुन्हा दाखल, विजवितरण अधिकार्यांना दमदाटी प्रकरण

652

   तळेगाव ढमढेरे,पुणे : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना अंगावर धावून जात शिवीगाळ दमदाटी करून मी तुला पाहून घेतो अशी धमकी देणारा टाकळी भिमा गावचा सरपंच रवींद्र बाळासाहेब दोरगे याला अद्यापही शिक्रापूर पोलिसांनी अटक केलेली नाही, त्याच्या शोधात पोलिसांनी विविध ठिकाणी जाऊन चौकशी केली असता फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तळेगाव ढमढेरे (ता शिरूर) येथील वीज वितरण कार्यालयात जाऊन मागील महिन्यातील दि. २४ रोजी कनिष्ठ अभियंता यांना कार्यालयात काम करत असताना आरोपी रवींद्र दोरगे याने सरकारी कामात अडथळा केला होता.  विजवितरण विभागाच्या वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर तक्रार केली नव्हती. परंतु  नुकतेच दि.३ रोजी आरोपीने कनिष्ठ अभियंता ए.बी.अलदार यांना फोनवरून टाकळी भिमा येथिल डीपी कधी मिळणार असे विचारले. त्यावेळी अलदार यांनी डीपी येणार आहेत बसवून देतो असे सांगितले. त्यावेळी आरोपी रवींद्र दोरगे याने तुम्ही सरकारचा फुकटचा पगार घेता का ? तुम्हाला लाज वाटते का ? मी आता मोकळा झालो आहे उद्या आल्यावर तुम्हाला बघून घेतो अशी धमकी दिली होती. याबाबत वीज वितरण अधिकारी यांच्या तक्रारीवरून दोरगेवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो  अद्यापही फरार असल्याने पोलिसांच्या हाती लागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तर सरकारी कामात अडथळा आणणारा सरपंच अजूनही मोकाटच असल्याने पोलिसांच्या कामगिरीवर शंका येत असल्याची चर्चा नागरिकांतून सुरु असल्याचे पाहावयास मिळत आहे.

.यापूर्वी टाकळी भिमा विजवितरण विभागातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यात आली होती.  परंतु गावातील पुढाऱ्यांच्या दबावामुळे विजवितरण कर्मचारी आपली तक्रार न करता बदली करून दुसऱ्या गावात गेला.अशा घटनांमुळे गावात वीज कर्मचारी मिळेल का ? यावर ग्रामस्थांतून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.   

वीज वितरणच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे स्थानिक जनता कंटाळली आहे. पंधरा ते वीस दिवस डीपी खराब अवस्थेत बंद असल्याने नागरिकांवर अंधारात राहण्याची वेळ अली आहे. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत असून यामुळेच अशा घटना घडत असल्याचे बोलले जात आहे.  वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळेत कामे केली तर असे प्रकार नक्कीच घडणार नाहीत अशी आशा ग्रामस्थ करीत आहेत. 

– प्रतिनिधी,जालिंदर आदक,(सा.समाजशील,तळेगाव ढमढेरे)




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *