राजगुरूनगर,पुणे : राजगुरूनगर तालुक्यात दोन मुलांच्या बापाने २१ वर्षीय मुलीला फुस लावून पळविल्याची घटना,याप्रकरणी खेड पोलिसांत तक्रार दाखल

456

       राजगुरूनगर,पुणे : राजगुरूनगर तालुक्यात दोन मुलांच्या बापाने २१ वर्षीय मुलीला फुस लावून पळविल्याची घटना नुकतीच घडली असून याप्रकरणी  संबंधित मुलीच्या आईने खेड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

        याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार मुलीस फूस लावून पळविणारी संशयित व्यक्ती ही खेड तालुक्यातील असून तो पिडित मुलीचा नातेवाईक आहे. सादर व्यक्ती ही  विवाहित असुन त्याला पत्नी व दोन लहाण मुले असल्याची माहिती मिळाली आहे. सदर इसम हा  नातेवाईक असल्याने त्यांचे पिडित मुलीच्या घरी नेहमी जाणे -येणे असायचे. शुक्रवार दि. ५  दुपारी १ वाजता घरातील आईवडील शेतावर गेले असताना पिडित मुलगी घरी एकटीच असताना संशयित यांने लग्न करायचे अमिष दाखवून दुसरी पत्नी व दोन लहान मुले असुनही पिडित मुलीला फुस लावून पळवून नेले. याबाबत मुलीच्या आईने खेड पोलिस तक्रार दाखल केली आहे.

      नुकताच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार बाह्य संबंध आता अपराध ठरत नसल्याने विवाहबाह्य संबंध असणाऱ्या चे फावलेे असल्याचे या दोन मुलांच्या बापाने २१ वर्षीय मुलीला फुस लावून पळवून नेण्याच्या घटनेतुन  दिसून येत आहे.याबाबत पिडित मुलीच्या आईने खेड पोलिस ठाण्यात माझी मुलगी हरवली अशी तक्रार दिली आहे.

– बाबाजी पवळे,राजगुरूनगर  




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *