पिंपळे जगताप, ता.शिरुर येथे आनंदराव पाबळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. 

आपल्या वडिलांच्या स्मृति आयुष्यभर जतन रहाव्यात म्हणून वृक्ष लागवड 

492

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : पिंपळे जगताप ,ता.शिरुर ज्येष्ठ नागरिक आनंदराव बाळासाहेब पाबळे यांच्या शनिवारी, दि.८ रोजी झालेल्या दशक्रिया विधीनिमित्त आपल्या वडिलांच्या सामाजिक योगदानाबद्दल स्मृति कायमस्वरूपी रहाव्यात म्हणून स्मृतिप्रित्यर्थ पाबळे परिवाराच्या वतीने येथील स्मशानभूमी परिसरात पाच झाडांचे रोपण करण्यात आले. तसेच पिंपळे व परिसरातील माध्यमिक विद्यालय व शाळांना प्रथमोपचार पेटी उपलब्ध करुन देण्यात आली. उपस्थित नागरिकांना प्रत्येकी एक याप्रमाणे दोन हजार आरोग्यविषयक मार्गदर्शक पुस्तिका भेट देण्यात आली. यावेळी आमदार अशोक पवार, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम. देशमुख, माजी सभापतीमंगलदास बांदल, पंचायत समितीच्या सदस्या सविता पर्हाड, माजी सभापती सुभाष उमाप, पी.के.गव्हाणे, माजी उपसभापती अनिल भुजबळ, भाजपचे तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके,अनिल काशिद, मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव डी.के.वळसे पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका डॉ.वर्षा शिवले, आबासाहेब गव्हाणे,सोमनाथ भुजबळ, गणेश कुटे, पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरे, तालुकाध्यक्ष सुनिल भांडवलकर, राजाराम गायकवाड ,नंदकुमार शहाणे ,नितीन बारवकर, सतीश धुमाळ, तालुका,जिल्हा, राज्यातील सर्व पञकार बंधु बहुसंख्य ने उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *