मुरबाड बस स्थानकाचा प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला, सुदैवाने कुठलंही जीवितहानी व दुखापत नाही  

403
         मुरबाड,ठाणे :  (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – मुरबाड बसस्थानकाचे नुतनीकरणचे इ भूमिपूजन  काही महिन्यांपूर्वी  खासदार कपिल पाटील व आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले होते , त्यामुळे हे काम त्वरित सुरू होईल असे वाटत असताना आज सायंकाळी या आगाराच्या प्रवेशद्वारा कडील स्लॅब चा भाग कोसळल्याने प्रवासी वर्गात भीती निर्माण झाली आहे.
    ज्या  ठिकाणी स्लॅब कोसळला त्या ठिकाणी नेहमी वर्दळ व मोटरसायकल उभ्या असतात. मात्र आज स्लॅब जरी कोसळला तरी सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही.  सुरक्षेचा उपाय म्हणून हा मार्ग प्रवाशांसाठी बंद केल्याचे आगार प्रशासनाने सांगितले. मुरबाड आगरची इमारत धोकादायक असल्याची जाणीव प्रशासनाला जरी असली तरी या कडे महामंडळाने दुर्लक्ष केल्याचे नागरिकांनी मत व्यक्त केले.  या बाबत आगार प्रमुख सतीश मालचे यांच्याशी संपर्क साधला असता तांत्रीक विभागाचे अधिकारी येऊन पहाणी करून गेले असून लवकरच या कामाला सुरुवात होईल अशी माहिती दिली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *