आमदार किसन कथोरे यांचा विजयानंतर मुरबाड मध्ये पहिलाच जाहीर सत्कार

568

मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – मुरबाड मधील श्री समर्थ सुपर बाजारच्या वतीने मुरबाड मधील ग्राहकांसाठी  ५५५/-च्या खरेदीवर टिव्हीस ज्युपिटर व अन्य ३० आकर्षक बक्षीस सोडत असा कार्यक्रम आयोजित करण्यात होता.  यावेळी आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या सोडत उघडण्यात आली. यावेळी मुरबाड विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले आमदार कथोरे यांचा निवडणुकी नंतर मुरबाड मध्ये  पहिला जाहीर सत्कार करण्यात आला.

  यावेळी टिव्हीस ज्युपिटर चा भाग्यवान विजेता पुरुषोत्तम मंडलिक यास आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते श्री समर्थ सुपर बाजारच्या वतीने चावी देण्यात आली व अन्य ३० भाग्यवान विजेत्यांनाही लकी बक्षीस देण्यात आली. यावेळी श्री समर्थ सुपर बाजारचे मालक प्रदोष हिंदुराव यांना मराठी उद्योजक म्हणून गौरविण्यात आले. मराठी माणसाने व्यवसायाकडे वळावे असे आवाहन यावेळी तरुणांना करण्यात आले. या वेळी मुरबाडच्या नगराध्यक्षा शीतल तोंडलीकर , नगरसेविका साक्षी चौधरी,अर्चना विशे, जयवंत सूर्यराव, श्रीकांत धुमाळ तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *