मुरबाड बस आगारात पासधारक विद्यार्थी व जेष्ठ नागरिकांची कुचंबणा,एस टी प्रशासनाचा गलथान कारभार, विध्यार्थी व जेष्ठ नागरिकांचे हालच हाल   

406
         मुरबाड,ठाणे :  (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – दिवाळीची सुट्टी संपल्याने शाळा,कॉलेजचे विध्यार्थी यांची  मुरबाड एस टी आगारात पास काढण्यासाठी रांग लागली असताना विध्यार्थी पासेसला  आधारकार्ड रजिस्टर करून पास देण्यात येणार असल्याचे आगार प्रशासनाने सूचित केले आहे. विध्यार्थी पासधारक व जेष्ठ नागरिकांचे प्रवाशी सेवा कार्ड एकाच संगणकावर बनविण्यात येत असल्याने विध्यार्थी व जेष्ठ नागरिकांची कुचंबणा होत असून यासर्वांचे सध्या हालच हाल होत आहेत.
    मुरबाड सारख्या शहरी व दुर्गम तालुक्यात मोठया संख्येने शाळा कॉलेज असल्याने विध्यार्थी संख्या ही मोठी आहे. त्याच प्रमाणे जेष्ठ नागरिक आपले प्रवाशी कार्ड बनवण्यासाठी दुर्गम भागातून मुरबाडला येतात.   विध्यार्थी पास व जेष्ठ नागरिक वर्गासाठी वेगवेगळे  कार्यालय असताना दिवाळीच्या सुट्टी नंतर येणाऱ्या विध्यार्थी वर्गाचे पासेस आधारकार्ड लिंक करून घ्यावे लागत असल्यांने एका एका पास साठी १५ ते २० मिनिटे प्रतीक्षा करावी  लागते.  यामुळे विध्यार्थी व जेष्ठ नागरिकांना प्रतीक्षा करत ताटकळत थांबावे लागत आहे आगार प्रशासनाने विद्यार्थी वर्गासाठी स्वतंत्र कक्ष पूर्वी प्रमाणे सुरू केल्यास विध्यार्थी व जेष्ठ नागरिकांच्या सोईचे होईल.  त्यामुळे जेष्ठ नागरिक व विध्यार्थी पासेस कार्यालय पूर्वप्रमाणेच स्वतंत्र  असावे अशी जोरदार  मागणी होत आहे.   जर ही  दोन्ही कार्यालय पूर्वी प्रमाणे स्वतंत्र केली तर जेष्ठ नागरिक व विध्यार्थी वर्गाची कुचंबणा थांबेल अशी अपेक्षा प्रवाशी,पास धारक वर्गातून व्यक्त होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *