भारतीय संविधान जागतिकीकरणाच्या काळातही प्रेरणादायी – बी.वाय. राऊत   

871

 नातेपुते,सोलापूर : (प्रतिनिधी,हनुमंत माने) – नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना सांस्कृतिक विभागाच्या वतीने दि. २६ नोव्हेंबर   भारतीय संविधान दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली व नातेपुतेचे प्रथम नागरिक सरपंच बी.वाय. राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.

यावेळी आर.पी.आय पश्चिम महाराष्ट्राचे सचिव एन.के.साळवे, ज्येष्ठ विचारवंत  लतिपभाई नदाफ, दै.सकाळचे प्रतिनिधी सुनिल राऊत यांची प्रमुख  उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुणे बी. वाय. राऊत म्हणाले, आजच्या काळात संविधान महत्त्वाचे आहे.  भारतीय संविधानातील प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. सार्वभौम, समानता, बंधुता,  स्वातंत्र्य ह्या शब्दाचे पारायणे करून  प्रत्येकाने आचरणात  आणावे असे आवाहन त्यांनी केले. प्रा. दत्तात्रय थोरात यांनी भारतीय संविधान निर्मितीचा इतिहास या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली.

आर.पी.आय पश्चिम महाराष्ट्राचे सचिव  एन.के. साळवे यांनी संविधानाचे महत्त्व स्पष्ट करताना म्हणाले,  सामाजिक आणि  आर्थिक समता स्थापन करून संविधानातील समतावादी भारत साकार करणे हाच खरा संविधानाचा गौरव ठरेल.  कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. सुनिता सुर्यवंशी यांनी उद्देशिकेचे वाचन केले.या कार्यक्रमाला प्रकल्प अधिकारी प्रा.श्रीकांत पवार सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. दत्तात्रय साळवे प्रा. सौ. विद्या बनसोडे, प्रा. जगदिश्चंद्र मुळीक, प्रा. सुहास नलवडे, प्रा. उत्तम सावंत, डॉ. दत्तात्रय शहाणे,  प्रा.संभाजी बनसोडे, प्रा. शांतीलाल मोरे, प्रा डॉ. बाळासाहेब निकम सोपान सुरवसे, प्रा. मोहन सावंत डॉ.राजेंद्र खंदारे  प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी महाविद्यालयाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला २६ नोव्हेंबरच्या दहशवाद्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या  हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच नातेपुते, कारुंडे सह नातेपुते परिसरात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीकांत पवार यांनी केले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *