तालुका स्तरीय निवड चाचणी कबड्डी स्पर्धा कुडूस येथे संपन्न 

451
       वाडा,पालघर : (प्रतिनिधी,संजय लांडगे) – वाडा तालुका कबड्डी असोसिएशन आयोजित तालुका स्तरीय निवड चाचणी कबड्डी स्पर्धां आज संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते शरद पाटील यांच्या हस्ते कुडूस येथे करण्यात आले. काल दि. ३० नोव्हेंबर व आज १ डिसेंबर असे २ दिवस या निवड चाचणीच्या स्पर्धाचे  नॅशनल स्कूलच्या मैदानावर आयोजन करण्यात आले होते अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष जितेश पाटील यांनी दिली.
         वाडा तालुका किशोर, किशोरी, कुमार, कुमारी खुला गट अशा विविध गटातील कबड्डी स्पर्धा भरवण्यात आल्या. यावेळी झालेल्या उद्घाटन समारंभामध्ये राष्ट्रीय खेळाडू राहुल सवर, पियुष पाटील व ऐश्वर्या पाटील  यांचा शरद पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उद्घाटन प्रसंगी किशोर गट मुली उचाट विरुद्ध बुधावली आणि कुमार गट मुले जिजाऊ क्रीडा मंडळ मांगाठणे विरुद्ध कुलदैवत खानिवली यांच्यामध्ये आकर्षक सामने झाले.
         उद्घाटन समारंभ गावचे माजी सरपंच इरफान सुसे, कबड्डी असोसिएशनचे जिल्हा सरचिटणीस जी. के. पष्टे सर, नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मुस्तफा मेमन, कबड्डी असोसिएशनचे वाडा तालुका उपाध्यक्ष रमेश भोईर, सरचिटणीस हरीश पाटील, जनार्दन पाटील, उत्तम चौधरी, मनोज चौधरी, काशिनाथ पाटील, शेखर पाटील, राजाराम पाटील व स्वप्नील जाधव यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *