विधानसभेत पहिल्यांदाच मुरबाडचा आमदार बसणार सरकारच्या विरोधी पक्षात ? सर्वाधिक मते मिळून ही विरोधात बसण्याची वेळ ?

673
           मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी :-जयदीप अढाईगे ) – राज्याच्या सत्ता पटलावर काय होतंय हे सर्वच राजकिय पक्ष पहात आहेत. मुरबाड विधानसभेचे विद्यमान आमदार किसन कथोरे हे राज्यात विक्रमी मते घेऊन विजयी झाले. राज्यात महायुतीचे सरकार येणार अशी खात्री असताना माजी महसूल मंत्री दिवंगत शांताराम भाऊ घोलप यांच्या नंतर पुन्हा मुरबाडला कॅबिनेट मंत्री पद मिळणार हा विश्वास मुरबाडकरांना असताना सत्तेच्या खेळात पहिल्यांदा मुरबाड विधानसभा क्षेत्राचा आमदार सरकार विरोधी पक्षातील आमदार म्हणून पहावयास मिळतो की काय ? यावर मुरबाड मध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
           राज्यात महासेना युतीची सत्ता येणार हे जवळजवळ निश्चित होत असताना अजूनही सेना भाजप महायुती होईल असा विश्वास गावपातळीवर व्यक्त होत आहे .मात्र सेनेच्या कणखर भूमिके मुळे गावपातळीवर सेना कार्यकर्ते ही खुश असून मुरबाड विधानसभेत आजपर्यंत परावलंबी असलेल्या सेना कार्यकर्त्याना राष्ट्रवादी कॉंग्रेस मधून आलेले व ठाणे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष असलेले सुभाष पवार यांच्या मुळे नवी ताकद मिळाली आहे.मुरबाड मध्ये आजपर्यंत प्रबळ असा विरोधी पक्ष म्हणून आता भाजप कडे पाहिले जात असून सत्तेतील विद्यमान आमदार व सरकार  विरोधात असणारे आमदार ही भूमिका आमदार किसन कथोरे कसे हाताळतात ? यावर ही जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अगामी आठ महिन्याने मुरबाड नगरपंचायतची निवडणूक असून आता सद्यस्थितीत मनसे हा विरोधकांची भूमिका बजावत आहे.  पण नगरपंचायत मध्ये एक हाती सत्ता असणाऱ्या भाजपला आता एकहाती सत्ते साठी शिवसेना,मनसे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस याच्याशी टक्कर द्यावी लागणार असे असताना व आमदार हे मंत्री पदाचे दावेदार असताना सध्यातरी सत्तेच्या खेळात विरोधात असलेले आमदार किसन कथोरे काय भूमिका घेतात ? हे महत्वाचे असून आता ते काय निर्णय घेतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधी पक्षात असताना मुरबाड करांना दिलेल्या आश्वासनांची ते कशी पूर्तता करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *