मुरबाडचे चंद्रकांत पवार सह २९ तज्ञ शिक्षक आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेसाठी इंडोनेशिया व मलेशियाला रवाना  

689
         मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – इंडोनेशिया ब मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेसाठी राज्यातून 30 तज्ञ शिक्षकांची निवड करण्यात आली असून हे सर्व आज या परिषदेसाठी रवाना झाले.
    यात मुरबाड  न्यू इंग्लिश स्कुलचे माजी प्राचार्य चंद्रकांत पवार यांच्या सह एम के गोंधळी ,ज्ञानेश्वर  म्हात्रे ,प्रमोद पाटील, प्रकाश घोडके,काशिनाथ भोईर यांच्या सह २४ तज्ञ शिक्षकांचा   समावेश आहे. राज्य सरकार शैक्षणिक प्रगल्भता वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न करते यात  ऑनलाइन कोर्स, संगणिकत अध्ययन,विविध परिसंवाद,शिक्षण वारी शिक्षण परिषद, तज्ञांच्या मुलाखती ,प्रगत शाळा भेटी ,अध्ययन ज्ञान , डिजिटल शाळा या सारखे अनेक उपक्रम राबविते.   या ही पेक्षा नाविन्यपूर्ण काही तरी असावे यासाठी क्रॉसवेज  संस्थेच्या पुढाकाराने इंडोनेशिया व मलेशिया येथे जाऊन तेथील शिक्षण पद्धतीचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो यासाठी राज्यातील या ३० तज्ञांची निवड करून त्याचा राज्याच्या नव्या शैक्षणिक धोरण व सुधारणा यासाठी कसा उपयोग होऊ शकतो ? याचा अभ्यास करणार आहे. या परिषदेसाठी मुरबाड तालुक्यातील चंद्रकांत पवार,प्रकाश घोडके व काशिनाथ भोईर यांचा समावेश असल्याने ठाणे जिल्ह्यासह मुरबाड तालुक्याला याचा चांगला फायदा होणार आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *