वाड्याचे नगरसेवक तथा पत्रकार रामचंद्र जाधव यांना सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ठ कार्याबाबद्दल राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान

361
         वाडा,पालघर : (प्रतिनिधी,संजय लांडगे) – अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे रविवारी संपन्न झालेल्या १२ व्या अखिल भारतीय प्रतिभा संमेलनात पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा वाडा नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक रामचंद्र जाधव यांना राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मागील वीस वर्षातील त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
       या प्रसंगी निवृत्त भारतीय लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल गुरमित सिंग, पद्मश्री डॉ. विजयकुमार शाह यांच्यासह भारतातील अनेक भागातून आलेले विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना जाधव यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले. राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल रामभाऊ जाधव यांचे पालघर जिल्ह्यासह त्यांच्या असंख्य मित्रपरिवार व सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *