बालदिन व जागतिक मधुमेह दिनानिमित्त हमाल,मापाडींची मधुमेह तपासणी,कुबेर फाउंडेशनचा उपक्रम 

362

शहादा,धुळे : (ब्युरो रिपोर्ट) – बालदिन व जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधत कुबेर फाउंडेशनच्या वतीने धुळे जिल्ह्यातील शहादा येथील कष्टकरी हमाल,मापाडींची मधुमेह तपासणी करण्यात आली. कुबेर फाउंडेशनच्या या विधायक उपक्रमाचे अभिनंदन होत आहे.
शहादा शहरातली धान्य मार्केट येथे जाऊन हमाल मापाडी लोकांची मधुमेह तपासणीचे  शिबीर घेण्यात आले.
कष्टकरी वर्ग सारं दुखणं अंगावर काढतात, मोठे दवाखाने त्यांना परवडत नाहीत आणि ते आपणहून स्वतःची आरोग्य तपासणी करणार नाहीत म्हणून कुबेर फाउंडेशनच्या वतीने अशा कष्टकरी २४ लोकांची मधुमेह तपासणी करण्यात येऊन आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *