कुबेर फाउंडेशनची अहमदनगरला उत्कर्ष बालगृहातील वंचित मुला-मुलींसमवेत दिवाळी साजरी, आदिवासी समाजातील वंचित मुला-मुलींना टी शर्ट,मिठाईची दिवाळी भेट देत विधायाक उपक्रम संपन

439

  अहमदनगर : (ब्युरो रिपोर्ट) – प्रेम,आपुलकी,सामाजिक भान आणि स्नेहातून निर्माण झालेल्या प्रेमाच्या नात्यामुळे कुबेर फाउंडेशनने यावर्षीची दिवाळी अहमदनगरच्या नेप्ती रोडवरील उत्कर्ष बालगृहातील वंचित मुला-मुलींसमवेत साजरी केली. सामाजिक बांधिलकीचा वसा जपत कार्यरत असणाऱ्या व इतरांना आदर्शवत व प्रेरणादायी ठरेल असे कार्य सुरु असणाऱ्या कुबेर फाउंडेशनच्या वतीने या मुला -मुलींना नवे टी शर्ट आणि मिठाईची भेट देत त्यांच्या समवेत दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला. हे कपडे घातल्याचा आनंद मुलांच्या चेहर्यावर ओसंडून वाहत होता. कुबेर फाउंडेशनचे संस्थापक व समूह प्रमुख संतोष लहामगे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
‘उत्कर्ष बालगृहा’चे समन्वयक युवराज गुंड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. शैक्षणिक,सांस्कृतिक व इतर सुविधांपासून वंचित असलेल्या आदिवासी समाजातील लहान मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून मूळ प्रवाहात आणण्याचे, त्यांच्यावर सामाजिक जाणिवांचा योग्य संस्कार करण्याचे काम उत्कर्ष बालगृहात केले जाते असे त्यांनी यावेळी सांगितले. गेल्या महिन्यात येथिल ८५ मुलांसमवेत कुबेर समुहाच्या अहमदनगर विभागाने समूहाचा वर्धापन दिन शालेय साहित्य व खाऊ देऊन साजरा केला होता.
या मुलांसाठी समुहप्रमुख संतोष लहामगे यांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. त्यात भर टाकून कुबेरच्या सदस्यांनी या मुलासाठी टीशर्ट घेतले.दिवाळीच्या निमित्ताने संमृद्धीचा आणि आनंदाचा प्रकाश या बालगृहातील मुलांच्या अंधारलेल्या जीवनात पसरवता यावा या हेतूने बालगृहातील मुुलांना टीशर्ट आणि फ्लेवर्ड मिल्क बॉटल्स आणि तसेच मुलींना कानातील इमिटेशन ज्वेलरी भेट देण्यात आली. दिवाळी निमित्त मिळालेल्या नवीन कपड्यांमुळे या मुलांच्या चेहर्यावर आनंद द्विगुणित झालेला पाहावयास मिळत होता.
यावेळी कुबेर फाउंडेशनच्या सदस्यांसमवेत गप्पा, गोष्टी आणि गाण्याचा आनंदही मुलांनी लुटला. यावेळी कुबेर सदस्य प्रवीण डी.कुलकर्णी, संध्या मेढे, ईश्वर बोरा, विजय माळी, दिपाली माळी, आरती फिरोदिया, छाया रसाळ, दत्ता शिंदे, विद्या शिंदे,सोमेश शिंदे,विवेक शिंदे,सुदर्शन कुलकर्णी   व महेश पटारे उपस्थित होते. या सदस्यांनी कुबेर समुहाबद्दल,समुहाअंतर्गत केल्या जाणार्या सामाजिक व साहित्यिक,विधायक कार्याबद्दल समुह प्रमुख संतोष लहामगे यांच्या सामाजिक दृष्टिकोनाची माहिती दिली.
या प्रसंगी कुबेर समुहाच्या दिवाळी अंकाची (वर्ष 3 रे ) माहिती आणि मिळालेल्या पुरस्कारांबद्दलही माहिती देण्यात आली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *