नीरा नरसिंहपूर ता. इंदापूर : माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देवस्थानला भेट दिली.

जनतेच्या सेवेसाठी कालही तत्पर होतो, आजही आहे आणि उद्याही राहील – देवेंद्र फडणवीस 

495
         निरा नरसिंहपुर,इंदापूर : (प्रतिनिधी,बाळासाहेब सुतार) – जनतेच्या सेवेसाठी कालही तत्पर होतो, आजही आहे आणि उद्याही राहील असे अश्वासन विधानसभेचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीरा नरसिंह पूर येथे उपस्थितांना दिले. देवेंद्र फडणवीस हे आपल्या कुलदैवत असलेल्या नीरा नरसिंहपूर ( ता. इंदापूर) येथे देव दर्शनासाठी आले होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माळशिरस चे आमदार राम सातपुते, दौंडचे आमदार राहुल कुल, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक रावसाहेब मगर बाळा भेगडे, नरसिंहपुरच्या सरपंच कांचन दिंगरे, भाजपाचे तालुका अध्यक्ष नानासाहेब शेंडे व त्यांचे सर्व सहकारी, भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       फडणवीस यांनी नरसिंह पूर येथे लक्ष्मी नरसिंहाच्या दर्शन व अभिषेक केला. त्यानंतर देवस्थान व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सरपंच कांचन डिंगरे, लक्ष्मीकांत डिंगरे उपसरपंच विलास ताटे यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. अभिषेक व पूजा पुजारी कमलेश डिंगरे यांनी केली. यावेळी राज्यातील राजकीय घडामोडींवर पत्रकारांनी विचारले असता फडणवीस यांनी टाळले. तसेच शरद पवार व संजय राऊत यांची मैत्री सर्वश्रुत आहे त्यांनी त्यांची मैत्री जपली, त्याचबरोबर उद्धव ठाकरे व तुमच्या मैत्रीबद्दल सर्वांनाच माहीत आहे मग आपल्या मैत्रीत काय चुकले याबद्दल काय सांगाल असे पत्रकारांनी विचारले असता त्यांनी उद्धव ठाकरे यांनाच विचारा असे सांगून वेळ मारून नेली.
        नीरा नरसिंहपूर येथे पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात तीर्थक्षेत्र विकासकामे चालू झाली ती सध्या पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. ही सर्व कामे फडणवीस यांच्या माध्यमातूनच होत असल्याने तसेच राज्याला जनतेच्या भल्याची जाणीव असलेल्या व्यक्तीची राज्याला गरज आहे.म्हणूनच या परिसरातील जनता त्यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पाहण्यास उत्सुक असल्याचे आज अनेकांच्या तोंडून येत असल्याचे जाणवले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *