निरा नरसिंहपुर,इंदापूर : शहाजी नगर तालुका इंदापूर येथील दत्त देवस्थान येथे महापूजा संपन्न

दत्त देवस्थान शहाजीनगर येथे महापूजेचा कार्यक्रम उत्साहात   

680
     निरा नरसिंहपुर,इंदापूर : (प्रतिनिधी,बाळासाहेब सुतार) – शहाजी नगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे दत्त जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व गुरुचरित्र पारायण दत्त देवस्थान शहाजीनगर तालुका इंदापूर येथे सुरू असून सोमवार ता.9 रोजी तरंगवाडी गावचे माजी सरपंच शिवाजीराव तरंगे यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते सकाळी महापूजा व महाअभिषेक संपन्न झाला.
      यावेळी माऊली दूध संस्थेचे चेअरमन मच्छिंद्र तरंगे यांच्या हस्ते संत गुलाब बाबा मूर्तीचा महाअभिषेक पार पडला.तर प्रसाद देवकर- पाटील यांच्या हस्ते मानाची आरती करण्यात आली.दत्त देवस्थानच्या वतीने उपस्थितांचे स्वागत तानाजीराव गायकवाड, पत्रकार नीलकंठराव  मोहिते यांनी केले. तर आज मंगळवार ता 10 रोजी पहाटे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता रतन झगडे, तसेच वडापुरी गावचे सरपंच शिवाजीराव तरंगे व पुणे ग्रामीण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तानाजीराव भोसले या कुटुंबाच्या वतीने महाआरती महाअभिषेककरण्यात आल्याची माहिती दत्त देवस्थानचे प्रमुख तानाजीराव गायकवाड यांनी सा.समाजशीलशी बोलताना दिली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *