शिक्रापूर,पुणे : सुगंधी उटणे ,फेसपँक बनवण्याचे प्रशिक्षण शिरूर तालुक्यातील म्हसे येथे संपन्न, ४० महिलांनी घेतला प्रशिक्षण शिबिराचा लाभ

418

    शिक्रापूर,पुणे : म्हसे,टाकळी,हाजी (ता शिरुर ) येथे यशस्वी नी वेल्फेअर फौडेशनच्या वतीने सुगंधी उटणे फेसपँकचे प्रशिक्षण देण्यात आले. या भागातील ४० बचत गटातील मुलीनी या प्रशिक्षण शिबिरात भाग घेतला होता .या प्रशिक्षणाला चांगला प्रतिसाद मिळाला. नुकतेच शिरुर येथे आदर्श माता पुरस्कार  मिळालेल्या या भागातील भामिनीताई शिंदे यांचे विशेष मार्गदर्शन या वेळी उपस्थित महिलांना लाभले.कार्यक्रमाचे स्वागतपर प्रस्ताविकामध्ये यशस्वीनीच्या सचिव नम्रताताई गवारे यानी सागितले की, हे प्रशिक्षण घेण्यापाठिमागे महिलानी तयार केलेले उत्पादन बाजारात चांगल्या प्रकारे उपलब्ध व्हावे व त्यांना योग्य तो बाजारभाव मिळावा. यासाठी या  प्रशिक्षण शिबिराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लवकरच येत असलेल्या दिवाळी सणासाठी बचत गटाच्या महिलाकडुनच उटणे घेण्याचे आवहान गवारे यांनी केले.तसेच धामारी येथील उद्योजिका रेखाताई केंजळे यांनी पेपर बँग कशाप्रकारे बनावयाच्या यांचे प्रशिक्षण  दिले.यावेळी रोहिणी वेताळ,पुष्पा पवार,दिपाली मुसळे,सविता शिंदे ,शोभा देवकर,उज्वला चौगुले  प्रतिक्षाशेलार मैना गव्हाणे,संगिता गुजाळ छाया मुसळे आदीनी प्रशिक्षणामध्ये भाग घेतला कार्यक्रमाचे अभार रुपाली खोमणे यांनी मानले

– प्रतिनिधी,राजाराम गायकवाड,(सा.समाजशील,शिक्रापूर)  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *