इंदापुर, पुणे : उजनी जलाशयात चक्क 42 किलो वजनाचा मासा जाळ्यात अडकला

1030

  42 किलो वजनाचा मासा जाळ्यात

इंदापुर, पुणे :  सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील भीमानगर या गावाजवळ, भीमा नदीवर उजनी धरण आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या तीन तरुणांना त्यांनी टाकलेल्या जाळ्यात तब्बल 42 किलो वजनाचा कटला जातीचा मासा अडकला .  उजनी धरण क्षेत्रात आजपर्यंत आढळलेला हा सर्वात मोठा मासा असल्याचे सांगितलं जात आहे. नितीन काळे, सुदाम चव्हाण आणि अक्षय चव्हाण या मच्छिमारांच्या जाळ्यात हा मासा अडकला. त्यांनी हा मासा आज इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील उपबाजारात विक्री करण्यास आणला होता. माशाची काही वेळातच 130 रुपये किलो या दराने 5500 रुपयांनी शंकर मोरे या खरेदीराने खरेदी केला. उजनी धरण पाणलोट क्षेत्र हे मासेमारी करण्यासाठी सर्वात मोठे क्षेत्र आहे. हजारो मच्छिमार या ठिकाणी मासेमारी करुन आपली उपजीविका करतात. मासे मोठ्याप्रमाणावर मिळत असल्याने इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील मासेमारीत सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे.
      उजनी धरणातील पाणीसाठा क्षमता जास्त असल्यामुळे या धरणाचा कोयना व जायकवाडी यानंतर पहिला क्रमांक लागतो. या धरणात पोचणारे पाणी थेट पुण्याच्या मुळामुठा सारख्या अनेक नद्यांमधून येते. एवढी मोठी जलक्षमता असलेला हा तलाव असल्याने येथे मत्स्यपालनाचा व्यवसाय ही मोठ्या प्रमाणात चालतो. या धरणाच्या जलाशयास यशवंतसागर म्हणतात. फ्लेमिंगो हा परदेशी पक्षी हिवाळ्यात या जलाशयावर येतो.
– प्रतिनिधी, सोमनाथ ढोले, (सा. समाजशील, इंदापूर, पुणे )



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *