शिक्रापूर,पुणे : शिवसेना शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात पन्नास हजार सदस्य नोंदणी करणार,शिवसेना उप जिल्हा प्रमुख अनिल काशिद यांची माहीती

1003

  शिक्रापूर,पुणे : शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली असुन तळेगाव ढमढेरे शिवसेना शाखेच्या वतीने तळेगाव ढमढेरे येथे त्याचा शुभारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख राम गावडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी उपजिल्हा प्रमुख अनिल काशिद,जिल्हा समन्वयक मच्छिद्र गदादे,मा.तालुक प्रमुख अनिल वडघुले, वाहतुक सेनेचे युवराज दळवी,ग्राहक संरक्षण कक्षाचे किरण देशमुख,अमोल हरगुडे, विभाग प्रमुख  आनंदराव हजारे, बापुसाहेब मासळकर,शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष हनुमंत लांडे मा.उपतालुका प्रमुख चंद्रकांत भुजबळ ,शिवसैनिक विठ्ठल काळे ,चंदु भुजबळ, उत्तम भोसले, प्रविण झोडगे,आप्पा गायकवाड, मयुर भुजबळ आदी उपस्थित होते.
यावेळी शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाची माहिती देताना राम गावडे म्हणाले की,शिवसेना पक्ष प्रमुख  उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर लोकसभा मतदार संघात शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली असुन त्याचा शुभारंभ करत असताना शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात पन्नास हजार सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट समोर ठेवून आम्ही काम करत आहे, आमचा शिवसैनिक जरी फाटका असला बाकीच्या पक्षाच्या तुलनेत गावात शिवसैनिकांची संख्या कमी असली तरी तो कडवा आहे आणि याच शिवसैनिकाच्या जोरावर आम्ही शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात पन्नास हजार सदस्य नोंदणी करणार आहोत. तसेच शिवसेना उपजिल्हा प्रमुख अनिल काशिद म्हणाले की, पन्नास हजार सदस्य नोंदणी करण्यासाठी शिवसैनिक प्रत्येक घरी जाऊन सदस्य नोंदणी करणार आहे.शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचे सुत्रसंचालन शिवसेना शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष हनुमंत लांडे यांनी केले.

– राजाराम गायकवाड,(सा.समाजशील,शिक्रापूर)  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *