पुणे : (प्रतिनिधी,सचिन दांगडे) – शेतकर्यांना सक्षम करण्याचे उद्दिष्ठ ठेवून कृषी उत्पादन पुरवठा क्षेत्रात काम करत असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या निंजाकार्ट या कंपनीच्या वतीने देशभर किसान दिवस उत्साहात साजरा केला. देशाच्या विविध भागात किसान उत्सव घेत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, हरयाना, पंजाब, हिमाचल प्रदेश आदी राज्यांतील कृषी क्षेत्राच्या माध्यमातून देशाच्या विकासात उल्लेखनीय योगदान दिलेल्या 300 पेक्षा अधिक शेतकर्यांचा गौरव करण्यात आला. याचबरोबर शेतकर्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, ज्ञानसत्रे आयोजित करण्यात आली. सर्पदंश, हृदयविकार, आगीपासून बचाव अशा गोष्टींवर ज्ञानसत्रे झाली. बीएमआय, रक्तदाब, मधुमेह यासह इतर आरोग्य चाचण्या करण्यात आल्या.
ताजी उत्पादने पुरवठा साखळी असलेली भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. ताज्या भाज्या आणि फळे देशभर पुरविणारी भारतातील ही उद्गाती कंपनी आहे. टायगर ग्लोबल, अॅस्सेल युएस, अॅस्सेल इंडियाअ, सिंजेंटा आणि इतर कंपन्यांशी भागीदारी आहे. कंपनीची जवळपास 150 मिलियन अमेरिकन डॉलर्सची उलाढाल आहे. फ्लिपकार्ट आणि वॉलमार्ट यांच्याकडून गेल्या चार वर्षांपासून गुंतवणूक होत आहे. भारताच्या दृष्टीने तंत्रज्ञान आणि आवश्यक सुविधा वापरुन शेतकरी ते ग्राहक ही सेवा पुरविली जाते. आज देशातील वीस पेक्षा जास्त राज्यांतील 60 हजारपेक्षा जास्त किराणा दुकान आणि सात मोठ्या शहरांतील रेस्टॉरंटमधून ही सेवा पुरविली जात आहे. देशातील सर्वात सक्षम आणि मोठी पुरवठादार कंपनी बनन्याचे, फळ-भाज्या उत्पादकांचे जीवनमान सुधारण्याचे आणि व्यावसायिक व ग्राहक यांच्यात नाते दृढ करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.