मुरबाड – म्हसा – खोपोली महामार्गाच्या कामामुळे धुळीचे साम्राज्य

929
        मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – मुरबाड तालुक्यातील सुप्रसिद्ध म्हसा यात्रा येत्या १० जानेवारी पासून प्रारंभ होणार आहे.मागील वर्षा पासून मुरबाड –  म्हसा – खोपोली महामार्गाचे काँक्रिटच्या कामाला प्रारंभ झाला.मागील वर्षी ही या कामा मुळे यात्रे वर धुळीचे साम्राज्य होते.  तर यात्रे करुनचे अनेक किरकोळ अपघात ही झाले.  तीच परिस्थिती आज ही असून या महामार्गाच्या कामामुळे धुळी मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  तर याच कामासाठी लागणारे बारीक खडीचे अवजड वाहने जाताना त्यातून पडलेल्या खडी मुळे किरकोळ आपघात वाढले आहेत.
    मुरबाड तहसीलदार कार्यालयात मागील काही दिवसांपूर्वी या यात्रेच्या आराखड्याची नियोजित  बैठक आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.  मात्र मुरबाड – म्हसा – खोपोली महामार्गाच्या संथ गतीने चालणाऱ्या कामामुळे किती अडथळे निर्माण होतात ? आरोग्यावर किती परिणाम होतात ? यासाठी काय नियोजन करण्यात आले आहे याची चर्चा सध्या मुरबाड परिसरात सुरू आहे.  म्हसा यात्रे पूर्वी पर्यंत हे काम मार्गी न लागल्यास या महामार्गावर वाहने चालवणेही कठीण जाणार आहे.  तर आरोग्यासाठी ही धोकादायक ठरणार आहे.  त्यामुळे लवकरत लवकर हे काम पूर्ण करण्याची मागणी नागरीकांकडून होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *