ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतातुर – कोरेगाव भीमा परिसरातील स्थिती 

656

 कोरेगाव भीमा : (प्रतिनिधी,सुनिल भंडारे) – कोरेगाव भीमा ता शिरूर आणि परिसरातील गावामध्ये गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण झालेले असून त्याचा मोठा परिणाम शेती पिकांसह जनजीवनावावर होत आहे.सध्याच्या या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

     मागील कित्येक वर्षाच्या तुलनेत या वर्षीचा हिवाळा अद्याप पर्यंत पाहिजे तेव्हढा जाणवताणा दिसत नाही. सध्याजर थंडी वाढायला लागली कि आकाश ढगाळमय झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.  हिवाळा असून ही सातत्याने थंडी गायब होत असल्याने या बदलत्या हवामानाचा शेतीपिकांवर रोगराई होण्याबरोबरच पिकांचे नुकसान ही होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.  वातावरणातील सध्याच्या लहरी बदलामुळे पिका वरील रोगराई दूर करण्यासाठी औषधं फवारणी खर्च वाढणार आहे. तर शेती मालाची प्रतही ढासळणार असल्याने उत्पन्न कमी होऊन शेतकऱयांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. सध्या परिसरातील गहू, हरभरा, ऊस, तरकारी, पिकावर मावा चा प्रादुर्भाव झालेला असल्याचे परीरातील शेतकऱ्यानी सांगितले.  ही परिस्थिती नुसती शिरूर तालुक्यात नसून संपूर्ण पुणे जिल्ह्यात असल्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *